Shrinidhi-Ghatate 
विदर्भ

‘मणिकर्णिका’तील झलकारीबाईला नागपूरचे स्वर!

नितीन नायगांवकर

नागपूर - नागपूरकर गायकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळविलेला नावलौकिक कौतुकाचीच बाब ठरत आली आहे. यात युवा गायिका श्रीनिधी घटाटे हिचा उल्लेख आवर्जून होतो. श्रीनिधीच्या नागपूर ते मुंबई या प्रवासातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट आहे. यात तिने झलकारीबाईची भूमिका साकारणारी अंकिता लोखंडे हिच्यासाठी पार्श्‍वगायन केले आहे.

सूरमणी पं. प्रभाकर धाकडे यांच्याकडे श्रीनिधीने शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. लाइव्ह शोजच्या माध्यमातून श्रीनिधी संपूर्ण विदर्भात ओळखली जाऊ लागली. प्रत्येक कार्यक्रमात श्रीनिधीचे असणे विशेष आकर्षण ठरू लागले. जुनी-नवी आणि पॉप अशी सर्व प्रकारची गाणी गाण्यात श्रीनिधीने हातखंडा मिळवला. एका मध्यस्थाच्या माध्यमातून श्रीनिधी शंकर महादेवन या लोकप्रिय गायक-संगीतकारापर्यंत पोहोचली. 

शंकर महादेवन यांनी पहिल्याच भेटीत तिचे भरभरून कौतुक केले आणि त्यानंतर स्वतःच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतले. विशेष म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये शंकर महादेवन यांच्यासोबत श्रीनिधी गाऊ लागली. काही वर्षांपूर्वी नागपूर महोत्सवात शंकर महादेवन यांचा लाइव्ह शो आयोजित करण्यात आला तेव्हा त्यांनी स्वतः नागपूरकरांना श्रीनिधीची ओळख करून दिली. श्रीनिधी ही भारतातील अष्टपैलू गायकांपैकी एक असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले आहेत. ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाचे संगीत देताना शंकर महादेवन यांनी ‘डंकिला गाके’ या गाण्यासाठी श्रीनिधीला संधी दिली. या चित्रपटातील हे गाणे झलकारीबाईची भूमिका साकारणारी अंकिता लोखंडे हिच्यावर चित्रित करण्यात आले आहे. श्रीनिधीचा आवाज या भूमिकेसाठी योग्य आहे का, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी कंगना राणावतचे मत जाणून घेतले. 

कंगनाने श्रीनिधीच्या स्वरांचे कौतुक करून त्यावर मोहर उमटवली. यापूर्वी ‘जय गंगाजल’ या चित्रपटात ‘इंडियन आयडॉल फेम’ सुगंधा दाते हिलादेखील प्रियांका चोप्रासाठी पार्श्‍वगायन करण्याची संधी मिळाली होती.

माझ्यासाठी एक स्वप्न साकार होण्याचा हा क्षण आहे. शंकर महादेवन यांच्यासारख्या गायक-संगीतकारासोबतची सफर मला येथपर्यंत घेऊन आली. ही तर सुरुवात आहे, आणखी बराच पल्ला गाठायचा आहे.
- श्रीनिधी घटाटे, गायिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT