rasdt bhav.jpg
rasdt bhav.jpg 
विदर्भ

शिधापत्रिकांचा हा गोंधळ उठला गरीबाच्या पोटावर अन्...

श्रीकृष्ण फुकट

आगर (जि. अकोला) : लॉकडाउनमध्ये अनेक नागरिकांवार उपासमारेची वेळ आली आहे. शासनाकडून गावागावत रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना नियमाप्रमाणे धान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळाचे वाटप देखील मोफत करण्यात येत आहे. परंतु, येथील जवळपास 100 कुटुंब कार्ड असतानाही त्यांची माहिती ऑनलाइन न झाल्याने धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यात अनेक कुटुंब विना कार्ड वाले देखील आहेत. अशा कुटुंबाना धान्य देण्यात यावे अशी शिफारस स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

अनेकांचे कार्ड आहेत ऑफलाइन
जिल्ह्यातील कुठलीच व्यक्ती उपासी राहू नये यासाठी शासन स्तरावर धान्याचे नियोजन करण्यात आले आहे. रास्त भाव दूकानाच्या माध्यमातून नागरिकांना नियमाप्रमाणे धान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांना प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळाचे मोफत वाटप करण्यात येत आहे. याआधी शासनाने सर्व शिधापत्रिका धारकांना ऑनलाइन प्रक्रिया करण्याचे सांगितले होते. त्यांच्या आदेशाने जवळपास सर्वच नागरिकांनी कार्ड ऑनलाइन करून घेतले. परंतु, येथील काही कार्ड ऑफलाइन असलेल्या गरजू नागरिकांना रास्त भाव दूकानदारांनी धान्य देण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर उपासमारेची वेळ आली आहे. आपल्या हलगर्जीचा फटका त्यांनाच मिळत असल्याचे वास्तव्य समोर येत आहे. त्याच बरोबर अनेक कुटुंबाजवळ आजपर्यंत शिधापत्रिका नसल्याचेही उघड झाले आहे. असे नागरिक उपासी राहू नये म्हणून येथील ग्रामपंचाय प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे धान्याची मागणी केली आहे.

विना कार्ड वाल्यांना धान्याचे वाटप होणार नाही
एप्रिल महिन्यात विना कार्ड वाल्यांना रास्त भाव दुकानामधून धान्याचे वाटप होणार नाही. परंतु, शासनाचे आदेश आल्यास ज्यांचे कार्ड ऑनलाइन नाही, ज्यांच्याकडे कार्ड नाही अशांना धान्याचा पुरवठा करावा लागेल.
-प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

बहुसंख्य कुटुंब आहेत विभक्त 
येथील बहुसंख्य कुटुंब विभक्त झाली आहेत. त्यांनी गरजेनुसार वेगवेगळी कार्ड बनविली आहेत. परंतु, आधार लिंंक नसल्याने त्यांना धान्याचे वाटप करता येत नाही. तसेच कार्ड नसलेल्या व्यक्तींना धान्य वाटपाबाबत कुठलेच आदेश नाहीत.
-नाना वानखडे, संचालक, रास्त भाव दुकान 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईव्हीएम अन् ओटीपी... वायकर-किर्तीकर मतमोजणी प्रकरणात ECI अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Internet Problem : फोनमध्ये फुल नेटवर्क,पण इंटरनेट चालत नाहीये? पटकन वापरा 'या' ट्रिक्स

Sleepiness In Office : काम भरपूर आहे पण ऑफिसमध्ये सतत येतेय झोप, या छोट्या गोष्टींनी झोप उडेल आकाशी

Pankaja Munde: अन् पंकजा मुंडेंनी हंबरडा फोडला...लोकसभा पराभवामुळे जीवन संपवलेल्या युवकाच्या घरी कल्लोळ!

ZP Teacher Recruitment : चाळीसगाव तालुक्यात शिक्षकांची 38 पदे रिक्त; पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण

SCROLL FOR NEXT