{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612863368783,"A":[{"A?":"I","A":13.066239590006433,"B":748.2995515695068,"D":182.86625833640298,"C":56.18981392518564,"a":{"B":{"A":{"A":"MAEShmGycjo","B":1}," 
विदर्भ

कोरोना काळात केला 'चट मंगनी पट ब्याह' अन् अवघ्या 2 महिन्यांतच अनेक दाम्पत्यांमध्ये पडली ठिणगी 

सुधीर भारती

अमरावती ः कोरोना काळात करण्यात आलेल्या "चट मंगनी पट ब्याह' या पद्धतीच्या अनेक विवाहांचा काडीमोड होण्याची नवीन समस्या निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील अनेक समुपदेशकांकडे सध्या अशाच प्रकरणांची गर्दी वाढत असून अनेक जोडपी तर एक किंवा दोन महिन्यांनंतरच विभक्त झालेली आहेत. 

कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले होते. त्यातच मध्यंतरी लग्नसमारंभांवर आलेली मर्यादा अनेकांच्या पथ्यावर पडली. "ना बॅण्ड बाजा, ना बाराती', अशीच काहीशी परिस्थिती असल्याने अनेक पालकांनी कुटुंबातील निवडक मंडळींच्या साक्षीने आपल्या मुलामुलींचे लग्न आटोपून घेतले. त्यावेळी घाईगर्दीने नातेसंबंध जोडण्याच्या वेळी मुलामुलींचे स्वभाव, नवरा मुलाची नोकरी, त्याचे आर्थिक उत्पन्न, सासरच्या मंडळींकडील कौटुंबिक पार्श्‍वभूमी आदी बाबींकडे पाहण्याचा वेळ मिळाला नसला तरी अनेक जण विवाहबंधनात अडकले. मात्र आता कोरोना ओसरू लागल्यानंतर नातेसंबंधातील दरीसुद्धा अधिक रुंद झाली. 

पती-पत्नीमधील मतभेद, कौटुंबिक वाद घरातून समुपदेशकांच्या दारी आलेत. मागील दोन महिन्यांत 80 टक्के केसेसमध्ये घटस्फोटदेखील झाले आहेत. एकमेकांच्या स्वभावाची ओळख होऊ  लागली असून अनेकांनी नोकऱ्या गेल्यानंतर व्यसनांचा आधार घेतला. त्यामुळे नवपरिणीत दाम्पत्यामधील वाद शिगेला पोहोचले आहेत. समुपदेशन केंद्रांमध्ये सध्या अशाच प्रकारच्या केसेस दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना काळातील विवाह समुपदेशकांच्या दारात तसेच घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचून एक नवीन सामाजिक समस्या निर्माण होत आहे.

अर्थात कोरोना काळातील सर्वच विवाहांच्या बाबतीत असे काही घडत आहे असे अजिबात नाही. अनेकांचे संसार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. जेथे काही समस्या निर्माण झाल्या आहेत त्यासाठी एकच कारणसुद्धा नाही. त्याला आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक यासोबतच इतरही विविध आयाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

मागील दोन महिन्यांत पती-पत्नीमधील वादांशी संबंधित अनेक प्रकरणे दाखल झालेली आहेत. समुपदेशनांनतर सुद्धा अनेकांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला तर काही प्रकरणी वाद शमविण्यात यश आले. ही एक नवीन सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.
-सुचिता बर्वे, समुपदेशिका
स्त्रीसंवेदना मंच, अमरावती. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा सामना होणार रद्द? चिंता वाढवणारे अपडेट्स, मालिका बरोबरीत सुटणार?

Pune Graduate Constituency: विजय निश्चित, मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ; महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव देशमुख यांचा दावा

Marathi News Live Updates: सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींवरील महिला पत्रकाराच्या आरोपांप्रकरणी २६ किंवा २७ ऑक्टोबरला सुनावणी

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार, थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा पार

SCROLL FOR NEXT