monkey 
विदर्भ

व्वारे काळतोंडे! अमरावती शहरात केले अनेकांना सळो की पळो... 

संतोष तापकिरे

अमरावती  : महिनाभरापूर्वी शहरातील कॉंग्रेसनगर परिसरात उपद्रवी माकडाने महिलेच्या पायाचा लचका तोडून तिला गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर शुक्रवारी, 17 जुलै रोजी रवीनगरात पुन्हा एका युवकास माकडाने जखमी केले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे रेस्क्‍यू टिमचे प्रमुख अमोल गावनेर यांनी स्पष्ट केले. 

काही दिवसांपासून शहराच्या विविध भागात काळतोंड्या माकडांचा धुमाकूळ सुरू असून, फळझाडे असलेल्या ठिकाणी जंगलातून मानवी वस्तीत येणाऱ्या माकडांचे कळप अधिक प्रमाणात दिसून येतात. रवीनगरात मानवीवस्तीत शिरून माकडांच्या कळपांनी धुमाकूळ घालणे सुरू केले. काही दिवस ही नित्याचीच बाब म्हणून नागरिकांनी दुर्लक्ष केले. परंतु शुक्रवारी, 17 जुलै रोजी एका युवकास जखमी केल्याने नागरिकांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली. रेस्क्‍यू टिमचे अमोल गावनेर पथकासह रवीनगरात दाखल झाले. उपद्रवी माकडाला आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न या पथकाने सुरू केले. 

गुरुवारी, 16 जुलै रोजी परतवाडा वनपरिक्षेत्रातील गौरखेडा कुंभी परिसरात एका उपद्रवी माकडावर ट्रॅंग्युलायझर गनचा वापर करून त्याला बेशुद्ध करून पकडले. उपद्रवी माकडाने गावात नागरिकांच्या नाकीनऊ आणल्याने माकडाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमरावती वनविभागाच्या रेस्क्‍यू टिमने बेशुद्ध करून पकडले. सय्यद सलीम, दिनेश लोखंडे, अमोल गावनेर, मनोज माहुलकर, फिरोज खान, नितीन अहिरराव, सतीश उमक, मनोज ठाकूर, वैभव राऊत हे कर्मचारी पथकासह सहभागी होते.  
 

संपादन - राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT