file photo 
विदर्भ

सिरोंचा येथे ताडीपेयाच्या हंगामास सुरुवात, अनेकांना मिळणार चार महिन्यांचा रोजगार

सकाळ डिजिटल टीम

सिरोंचा (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील सर्वच गावांमध्ये ताडीपेयाच्या हंगामास सुरुवात झाली आहे. ताडीच्या झाडापासून मिळणाऱ्या या रसाद्वारे येथील नागरिकांना चार ते पाच महिन्यांचा रोजगार मिळतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो. ताडी योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहे, असे मानले जाते.

ताडीपेय विक्रीतून स्थानिक आदिवासी समाजातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. सिरोंचा तालुक्‍यातील झिंगानूर, रेगुंठा, परसेवाडा, पातागुडम, अंकिसा, नगरम आदी परिसरातील गावांमध्ये या वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या थंडीला सुरुवात झाली असून ताडीपेयही उपलब्ध होत आहे. आतापासून पुढील चार ते पाच महिने हे पेय या परिसरात खूप प्रमाणात मिळणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात ताडी व शिंदी हे पेय उपलब्ध होते. मात्र या परिसरात ताडीची झाडे अधिक प्रमाणात असल्याने या पेयाचे प्रमाण अधिक आहे.

झाडांच्या पानाचा झोपडीसाठी अपयोग

ताडी हे झाडावरून काढल्यानंतर काही वर्षांत ते झाड पूर्णत: सुकून जाते. त्यानंतर ही ताडीची झाडे तोडून टाकली जातात व त्याचा उपयोग घराभोवती तसेच शेतीच्या संरक्षणासाठी कुंपणाप्रमाणे केला जातो. तेलगू भाषिक नागरिक सणासुदीच्या काळात ताडीला महत्त्वाचे स्थान देत असतात. या झाडाच्या पानांचा उपयोग आजही झोपडी बांधण्याकरिता केला जातो व झाडाच्या खोडाच्या आतील भागातील पांढऱ्या भागांचे लहान लहान तुकडे करून त्यांना उन्हामध्ये वाळवून त्याला बारीक करून संग्रहित करून ठेवले जात होते.

चहाऐवजी ताडी देण्याची प्रथा

ही परंपरा आता लोप पावत असली; तरी ताडीच्या वृक्षांचे पेयद्रव्यासोबतच इतरही अनेक उपयोग आहेत. ताडीच्या खोडापासून नावसुद्धा तयार करण्यात येते. या काळात अनेक ठिकाणी ताडीची छोटी दुकाने असतात किंवा घरातही ताडी विकली जाते. मात्र, अतिदुर्गम भागांत ही ताडी व्यावसायिक रूपात न वापरता दैनंदिन पेय म्हणून वापरली जाते. पाहुणे आल्यास चहाऐवजी ताडी देण्याची प्रथाही अनेक गावांत आहे.

भेसळीचीही भीती…

जिल्ह्यात ताडी हे अनेकांचे आवडते पेय असले; तरी काहीजणांना याचे व्यसनही लागते. मग, त्यांना वर्षभर ताडी हवी असते. त्यांची तलफ भागविण्यासाठी रासायनिक पावडर टाकलेले ताडीसारखे पेय तयार करण्यात येते. मागील काही वर्षांत ताडीमधील भेसळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा! 'या' तीन दिग्गज व्यक्तींच्या नावांचा समावेश

निरागस वासू साकारला, आता नजर खलनायकाच्या भूमिकेवर; राज कुंदन म्हणतो, “मला पुढे मांजरेकर सरांसोबत...”

Mohan Joshi : मोहन जोशी हे महाराष्ट्राचा अभिमान ;उद्योगमंत्री उदय सामंत : संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

भाजपने राज्यसभेच्या ८ उमेदवारांची केली घोषणा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांचा पत्ता कट; योगींच्या मंत्र्याची वर्णी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT