विदर्भ

मराठा आरक्षणाचा ठराव आज मांडणार

सकाळन्यूजनेटवर्क

नागपूर - मराठा समाजाने आयोजित केलेल्या संपूर्ण राज्यातील मोर्चांचा लाभ घेण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असतानाच देवेंद्र फडणवीस सरकारने पुढाकार घेत उद्या (ता. ६) या संबंधात प्रस्ताव मांडण्याचे ठरवले आहे. नागपूर अधिवेशनात मराठा मोर्चाचा विषय गाजेल, सरकारला या विषयावर अडचणीत आणता येईल, अशी व्यूहरचना विरोधक आखत असतानाच सत्ताधारी आघाडीनेच हा प्रस्ताव पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

विधीमंडळ कामकाजाच्या नियमांनुसार दर मंगळवारी सत्ताधारी पक्षातर्फे ठराव मांडला जातो. हा ठराव व त्याचा तपशील काय असावा हे ठरवण्याचा अधिकार सत्ताधारी आघाडीला असतो. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पहिल्याच आठवड्यात सरकारने चढाईचे धोरण स्वीकारून या संबंधात आपण आजवर केलेल्या कामाची पुन्हा एकदा घोषणा करावी असे ठरवले आहे. मराठा समाजातील मोर्चेकऱ्यांना शांत करण्यासाठी सरकारने युवकांना; विशेषत: विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सवलत मिळावी, यासाठी निर्णय घोषित केले आहेत. ६० टक्‍क्‍यांवर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थांना आर्थिक निकषानुसार सवलत तसेच युवकांनी उद्योग सुरू करावेत, यासाठी पतपुरवठा उपलब्ध करून देणे या फडणवीस सरकारने केलेल्या मोठ्या घोषणा आहेत. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने अत्यंत सविस्तर अभ्यास केला आहे. या अभ्यासाचा आधार घेत न्यायालयात दाखल केलेली याचिका निर्णयाप्रत पोचावी, यासाठी सरकारने अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विधीज्ञ हरीश साळवे सरकारची भूमिका मांडणार आहेत. जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन समाजाचे प्रश्‍न काय आहेत, याचा शोध घेतला गेला आहे. मराठा समाजाबाबत अशी संवेदनशील भूमिका यापूर्वी कुणीही घेतली नव्हती हे विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडले जाईल. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावरील या चर्चेला प्रारंभ करतील. नगरपालिका निवडणुकांतील विजयानंतर फडणवीस सरकार आत्मविश्‍वासपूर्वक पावले टाकत आहे. आर्थिक सवलत तसेच रोजगारनिर्मितीला देण्यात येणारी चालना हे मराठा समाजाच्या प्रश्‍नाची सोडवणूक करणारे मोठे निर्णय आहेत. ते आपण विधिमंडळात मांडले तर विरोधी पक्षाच्या हाती या विषयावर आंदोलन करण्यासारखे काही राहणार नाही, असे सत्ताधाऱ्यांना वाटते. 

आशिष शेलार मांडणार ठराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या अधिवेशनात विधिमंडळ कामकाजाचा भार सांभाळणाऱ्या विनोद तावडे यांनी हा ठराव मांडण्याचे ठरवले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडतानाच शासनाने आम्ही मराठा समाजाचे निवेदन स्वीकारण्यास तयार आहोत, असे पुन्हा एकदा नमूद करावे असे सांगितले आहे. मुंबईत भाजपचे महत्त्वाचे नेते असणारे आशिष शेलार यांनी हा ठराव मांडावा असे ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: येवला निवडणुकीत छगन भुजबळांचा दबदबा कायम, शिंदेंच्या उमेदवारांना लोळवलं

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT