Maratha Reservation Sakal
विदर्भ

Maratha Reservation : '...तर परत जाऊ देणार नाही'; शिंदे गटाच्या आमदाराची मराठा आंदोलकांना खुली धमकी?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

दत्ता लवांडे

बुलढाणा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबारही केला असून आंदोलकांनी अनेक गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली.

त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणची एसटी बस सेवा ठप्प करण्यात आली आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

दरम्यान, आज बुलढाण्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम असून या कार्यक्रमात मराठा आंदोलक आंदोलन करण्यात येणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तर या कार्यक्रमात राडा केला तर मराठा आंदोलकांना माघारी जाऊ देणार नाही असा खुला इशारा बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.

"अमरावती किंवा विदर्भाच्या भागात राहणारा सर्व मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे. आमच्या आमदार खासदारांना ओबीसीचे आरक्षण आहेच. तरीदेखील हा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या पाठीमागे उभा आहे. आम्हाला आरक्षण असताना आम्ही मोर्चे काढले आंदोलने केलं." असं संजय गायकवाड म्हणाले.

"बुलढाण्यामध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल. आमच्या जिल्ह्यामध्ये बंदचा किंवा आंदोलनाचा काही परिणाम होणार नाही. जर कुणी या कार्यक्रमात राडा करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला माघारी जाऊ देणार नाही. आंदोलने लोकशाही मार्गाने करावीत. कुणी जर या कार्यक्रमात आंदोलन केलं तर हे लक्षात ठेवा की, मी पण मर्द मराठा आहे. कुणाला सोडणार नाही." अशा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT