Maratha Shivsainik Sena  workers detained
Maratha Shivsainik Sena workers detained 
विदर्भ

मराठा शिवसैनिक सेनेचे पदाधिकारी स्थानबध्द

मंगेश शेवाळकर

हिंगोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंगोली दौऱ्यात दुष्काळाच्या प्रश्नावरून आंदोलन होण्याची धास्ती घेतलेल्या प्रशासनाने मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी (ता. 6) स्थानबध्द करून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बसविण्यात आले आहे. 

हिंगोली येथे मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व सामान्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक आंदोलन झाले आहेत. शेतकरी व सर्व सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी झालेल्या आंदोलन प्रकरणात अनेक वेळा पोलिस कारवाई देखाली झाली आहे. मात्र त्यानंतरही या संघटनेचे आंदोलन सुरुच आहेत. मागील वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडोळी येथे आले असतांना मराठा शिवसैनिक सेनेने आंदोलन केले होते. त्यामुळे सभेत काही काळ गोंधळ झाला होता. 

दरम्यान, जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतांनाही शासनाने केवळ हिंगोली, कळमनुरी व सेनगाव तालुकाच दुष्काळग्रस्त जाहिर केला आहे. त्यामुळे वसमत व औंढा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा या मागणीसाठी मराठा शिवसैनिक सेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोलीत येणार असून यावेळी रामलिला मैदानावर आयोजित कार्यक्रमात गोंधळाची धास्ती घेऊन प्रशासनाने संघटनेचे संस्थापक विनायक भिसे पाटील, अनिल शिंदे, संजय भामिरगे, वैजनाथ बोंगाणे, विजय पाटील, राजू पाटील, शिवाजी भवर, अविनाश चव्हाण, पिंटू जाधव, सचिन मिरासे,  बंडू कल्याणकर यांच्यासह पंन्नास कार्यकर्ते स्थानबध्द केले आहे. यासर्वांना हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बसविण्यात आले आहे. मुख्यमंत्री श्री.फडवणीस दुपारी नांदेडकडे रवाना झाल्यानंतरच त्यांची सुटका होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT