File photo of Dhananjay Munde
File photo of Dhananjay Munde 
विदर्भ

नागपुरातील 'यादवी'ला मुख्यमंत्री जबाबदार : धनंजय मुंडे

सकाळवृत्तसेवा

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी दरोडा पडतो. मुख्यमंत्र्यांच्या शहरात यादवांच्या दोन गटांमध्ये सशस्त्र हाणामारी होते. अधिवेशन सुरू असतानाही खुनांची मालिका सुरू असते. नागपुरात माजलेल्या या 'यादवी'ला राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, या शब्दांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कायदा व सुव्यवस्थेवरून हल्ला चढवला. 

शरद रणपिसे यांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर धनंजय मुंडे बोलत होते. राज्यातील गुन्हेगार कायदा व सुव्यवस्था यंत्रणेला घाबरत नाहीत. हिवाळी अधिवेशनाला जर गुन्हेगारीने सलामी मिळत असेल, तर जनतेच्या हितासाठी नागपूरच्या रस्त्यांवर उतरून दोन हात करण्याची आमचीही तयारी आहे. भाजप सरकार जनतेला गृहित धरत असून, त्यांनी गुजरातपासून धडा घ्यावा, असेही मुंडे म्हणाले. 

मुन्ना यादव कोण आहेत?, भाजपची सत्ता येताच त्यांना पद कसे मिळते, असा सवाल उपस्थित करतानाच गुन्हे दाखल असतानाही मुन्ना यादव यांना अटक होत नाही, ही गंभीर बाब आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्यात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करू, असे म्हटले होते. मात्र, तीन वर्षांत सरकारने महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त केला. जमीन विकून खाल्लेला पैसा, पावडर खाऊन बनविलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार-खासदार जास्त दिवस टिकत नाही, अशी म्हण खेड्यांमध्ये प्रचलित होत आहे, अशी कोटीही त्यांनी केली. 

माहिती व तंत्रज्ञान विभागात गैरव्यवहार 
मुख्यमंत्र्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागापर्यंत गैरव्यवहाराचे लोण गेले असून, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सेवा पुरवठादार नियुक्तीत घोटाळा झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. पोलिस महासंचालक पदावर असलेले ब्रिजेश सिंह यांना जनसंपर्क अधिकारी म्हणून नेमत त्यांच्याकडे 'मी लाभार्थी' जाहिरातीची जबाबदारी दिली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

इनोव्हेव कंपनीला लाभ 
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी नियुक्त केलेल्या इनोव्हेव कंपनीलाच काम मिळावे, या पद्धतीने निविदा बनवणे, आदी बाबी जाणीवपूर्वक केल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. या कंपनीला प्राथमिकरित्या दिसणारे काम पंचावन्न कोटींचे असले तरी, प्रत्यक्षात एका सेवेसाठी सहा महिन्यांना पाच कोटी रुपये द्यायचे आहेत. हा घोटाळा कोट्यवधींचा असून, याची चौकशी न झाल्यास संशयाची सुई मुख्यमंत्र्यांकडेही गेल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

सॅनिटरी नॅपकिन्सच्या खरेदीत घोळ 
ग्रामविकास विभागाने केलेल्या सॅनिटरी नॅपकीन्सच्या खरेदी निविदेतही अनियमितता झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. चिक्की घोटाळ्यातील आरोपी कंपनी वैद्य इंडस्ट्रीज या कंपनीला एक हजार 44 कोटींचे तीन वर्षांचे एकाच वेळी काम दिल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT