Dr.-Vedprakash-Mishra
Dr.-Vedprakash-Mishra 
विदर्भ

पदवी प्रमाणपत्रही देणार परत - डॉ. वेदप्रकाश मिश्रा

सकाळवृत्तसेवा

नागपूर - कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी १९८७ साली गांधी विचारधारा विभागातून मिळविलेले पदवी प्रमाणपत्र परत देण्याचा निर्णय घेतला. तसे अधिकृत पत्र डॉ. मिश्रा यांनी बुधवारी (ता.२१) कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांना पाठविले. यापूर्वीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून प्रतिष्ठेचा ‘जीवनसाधना पुरस्कार’ परत केला. 

गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमातील ‘फिल्ड रिपोर्ट’ कॉपी केल्याच्या आरोपप्रकरणी न्या. रत्नपारखी समितीचा अहवालानुसार ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणात विद्यापीठाने वारंवार बाजू मांडण्याची संधीही दिली. त्यानंतरही डॉ. मिश्रा यांनी ती फेटाळली. आता निर्णयाचे सर्व अधिकार कुलगुरूंकडे दिले आहेत. 

पदवी प्रमाणपत्रही देणार परत
मात्र, डॉ. मिश्रा यांनी बुधवारी (ता.२१) कुलगुरूंना पत्र पाठवीत आपली पदवी परत करत असल्याचे सांगितले. दरम्यान, या पत्रामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. यापूर्वीच आईचा अपमान झाल्याचे कारण देत, विद्यापीठाचा मानाचा जीवनसाधना पुरस्कार परत केला. मात्र, व्यवस्थापन परिषदेने त्यांची ही मागणी नाकारली. तसेच पुरस्कार परत करण्याची कुठलीही तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. त्यातूनच आज पदवी प्रमाणपत्र परत केल्याचे पत्र दिले. पत्रात १९८७ पासून पदवी घेतलीच नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, डॉ. मिश्रांच्या पदवी प्रमाणपत्र परत केल्याच्या पत्रामुळे चर्चेला उधाण आले  आहे. गेल्या तीस वर्षांपासून विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरून विद्यापीठावर आपले  अधिराज्य गाजविणाऱ्या मिश्रांचा हा पराभव असल्याचे बोलले जाते.

परत घेता येणे अशक्‍य - कुलगुरू 
डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी पत्राद्वारे पदवी परत केल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्यावर या पदवीसंदर्भातील प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांची पदवी परत घेता येणे अशक्‍य असल्याची माहिती कुलगुरू डॉ. काणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ते म्हणाले, पदवी परत करताना केवळ दोनच कारणांनी परत करता येते. त्यात एक कारण म्हणजे एकावेळी दोन पदवी घेतली असेल तर त्यापैकी एक पदवी परत करावी लागते. याशिवाय पदवीत सुधारणा  करण्यासाठीच ती परत करता येते. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी या दोन्ही कारणांनी पदवी परत केली नसल्याने ती परत घेता येणार नसल्याचे डॉ. काणे म्हणाले. 

चौकशी होणारच
डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी विद्यापीठाकडे पदविका परत करणार, असे पत्र स्वत:हून दिले आहे. असे असले तरी विद्यापीठाने पारदर्शी पद्धतीने केलेल्या कारवाईचे हे यश असल्याचे बोलले जाते. पदवी परत करण्याचा अधिकार कुठल्याही विद्यार्थ्याला स्वत:हून नसतो. त्यामुळे मिश्रांनी पदवी परत करण्याचे पत्र दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT