नागपूर - मुद्रा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री फडणवीस. शेजारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रा. अनिल सोले.
नागपूर - मुद्रा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री फडणवीस. शेजारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रा. अनिल सोले. 
विदर्भ

मिहानमध्ये कौशल्य विकास पार्क - मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

नागपूर - मिहान येथे संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील डिफेन्स पार्क तयार होत आहे. कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी टाटांसोबत तीनशे कोटी रुपये गुंतवणुकीचा संरक्षणक्षेत्रातील कौशल्य विकास पार्क सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

फॉर्च्युन फाउंडेशनच्या वतीने आयोजित युथ एम्पॉवरमेंटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्टार्टअप संदर्भात राज्याचे नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. येत्या पाच वर्षांत मटेरियल अर्थव्यवस्थेपेक्षा डिजिटल अर्थव्यवस्थेला जास्त महत्त्व येणार आहे. रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. त्याकरिता नागपूरसह राज्यातील बारा जिल्ह्यांत स्टार्टअप इको सिस्टीम सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगितले.  यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार विकास महात्मे, आमदार सर्वश्री. प्रा. अनिल सोले, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधाकर देशमुख, नागोराव गाणार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राजेश बागडी, प्रा. कुणाल पडोळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, युवक वर्गातून रोजगार व स्वयंरोजगाराची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. दुसरीकडे उद्योगक्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी युथ एम्पॉवरमेंट समिट हा एक स्त्युत्य उपक्रम आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात झाली आहे. यातून ३५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

तीन हजार युवकांना रोजगार
युथ समिटमुळे मुद्रा योजनेअंतर्गत पाचशे जणांना लाभ तसेच तीन हजार युवकांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झाल्याचे प्रा. अनिल सोले यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुद्रा योजना, स्टार्टअप व स्टॅण्डअप इंडिया याअंतर्गत नवीन उद्योग व्यवसाय सुरू केलेल्या युवकांना धनादेशाचे वाटप तसेच विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या युवकांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. मुद्रा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, जिल्हा अग्रणी बॅंकेचे अयुब खान तसेच जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT