Savarkar-Sahitya-Sammelan
Savarkar-Sahitya-Sammelan 
विदर्भ

साहित्यकृतीत राष्ट्रहित आद्यचिंता असावी

सकाळवृत्तसेवा

नागपूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र आणि त्यांच्या साहित्यात जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा विचार आहे. प्रत्येक साहित्यकृतीतून त्यांनी राष्ट्र, राष्ट्रहित, राष्ट्ररक्षण व समरसतेची पेरणी केली. सावरकरांच्या संदेशाप्रमाणे राष्ट्रहित हीच साहित्याची आद्यचिंता असावी, अशी अपेक्षा लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली.

स्वा. सावरकर स्मारक समितीतर्फे आयोजित व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ पुरस्कृत द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. २४) सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. 

विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित उद्‌घाटनीय सोहळ्याला संमेलनाध्यक्ष डॉ. वि. स. जोग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष कांचन गडकरी, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, महासचिव डॉ. अजय कुळकर्णी, शैलजा जोग उपस्थित होते.

सावरकरांसारखा प्रखर राष्ट्रभक्त मिळावे हे समस्त भारतवासीयांचे भाग्य आहे. सावरकर साहित्य संमेलनातून राष्ट्रवादाची प्रेरणा मिळेल. राजकीय, सामाजिक सांस्कृतिक जीवनातील कोणत्याही कृतीच्या केंद्रस्थानी राष्ट्रहित असावे. भाषा कोणतीही असली तरी विचारांमध्ये एकवाक्‍यता, समान विचार असावे, असे मत सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उषाताई चाटी यांचा सत्कार करण्यात आला. जयोस्तुते विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. अजय कुळकर्णी यांनी केले. संचालन विवेक अलोणी व शुभा साठे यांनी केले.

सुमित्रा महाजन भावुक होतात तेव्हा
लोकसभेत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांवर नियंत्रण ठेवून कामकाज सुरळीत चालविण्याची जबाबदारी सक्षमपणे पेलणाऱ्या सुमित्रा महाजन सावरकरांवर भाषण करताना दोनवेळा भावूक झाल्या. सुधीर फडके यांनी लोकसहभागातून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रपट तयार करण्याचा विचार व्यक्त केला. त्यासाठी अनेक हात पुढे आले. महिलांनी अंगावरील दागिनेही काढून दिल्याची आठवण करून देतानाच त्यांना दाटून आले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सावरकरांवर केलेली कविता प्रेक्षकांसमोर मांडतानाही त्या भावुक झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT