विदर्भ

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका : नितीन गडकरी

सकाळवृत्तसेवा

बाभूळगाव (जि. यवतमाळ) : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक झाल्या आहेत. त्याचे कारण शोधले, तर सिंचनाचा अभाव हे दिसून येते. शेतीला पाणी मिळाल्यास उत्पन्नात अडीच पटीने वाढ होईल. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पैसे दिले आहेत. यापुढेही देणार, आता खासदार व आमदारांनी लक्ष देऊन ही कामे एका वर्षात करून घेतली पाहिजेत. यातून शेतकऱ्यांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

बाभूळगाव तालुक्‍यातील घारफळ येथे रविवारी 738 कोटींच्या बळिराजा जलसंजीवनी योजनेचा प्रारंभ झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, स्मार्ट शहरे व्हायला लागली आहेत. आता स्मार्ट व्हिलेज व्हावे, यासाठी नव्या संकल्पनांना प्राधान्य दिले आहे. शेतीपूरक व्यवसायाला महत्त्व देण्यासाठी शेतकऱ्यांच्या तुराट्या व पऱ्हाट्यापासून सीएनजी ऊर्जा तयार करण्याचे काम केंद्र शासनाने हाती घेतले आहे. दळणवळणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. शेतकरी आत्महत्यांचे कारण शोधून त्यावर योग्य दिशेने काम करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सीएनजी ऊर्जा तयार कराव्यात, यासाठीच्या योजना केंद्र शासनाने हाती घेतल्या आहेत. सीएनजीवर ट्रॅक्‍टर चालविले, तर इंधन स्वस्त स्वरूपाचे मिळेल. पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करून शेतीतील धोके दूर करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्ह्यात आठ हजार कोटींची कामे 
मी स्वप्न दाखविणारा नेता नाही. मे जे सांगितले ते झालेच पाहिजे, असे माझे धोरण आहे. यापूर्वी जिल्ह्यात आलो तेव्हा अनेक कामांची घोषणा केली होती. त्यातील रस्त्यांच्या कामांना सुरवात झाली आहे. सिंचन प्रकल्पांसाठी निधी दिला. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात माझ्याकडील खात्याची तब्बल आठ हजार कोटींची कामे सुरू असल्याचेही गडकरी म्हणाले. 

64 प्रकल्पांसाठी 714 कोटी 
बळिराजा जलसंजीवनी योजनेव्यतिरिक्त "इजबीग' योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 64 प्रकल्पांसाठी 714 कोटी रुपयांची घोषणा गडकरी यांनी केली. त्यात दोन मोठे, सहा मध्यम, तर 56 लघु अशा 64 प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT