wardha 
विदर्भ

शेतकऱ्याच्या घराला आग; ७० क्विंटल कापूस जळून खाक

राहुल खोब्रागडे

वर्धा : पवनार येथील शेतकरी रात्री आपल्या कुटुबीयांसोबत घरी गाढ झोपेत असताना त्याच्या घराला अचानक आग लागली. मोठ्या कष्टाने पिकविलेले पीक त्याच्या डोळ्यादेखत जळुन खाक झाले. या आगीत कापुस, घर आणि शेतीच्या साहित्यांचे अंदाजे ६ लाखाचे नुकसान झाले. ही घटना पवनार येथे मंध्यरात्रीच्या सुमारास हेमराज हिवरे यांच्या घरी घडली.

कापसाचा भाव वाढेल आणि चार पैसे जास्त मिळतील. या आशेवर हेमराज हिवरे यांनी आपल्या पाच ऐकर शेतात पिकलेला ७० क्विंटल कापुस घरी एका खोलीत साठवुन ठेवला होता. मात्र काल रात्री अचानक आग लागली आणि कापसाने पेट घेतला व काही वेळातच होत्याच नव्हते झाले. शेतकरी हेमराज हिवरे व दौलत हिवरे यांच्या घराला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. आगेचे लोळ दिसताच येथील नागरीकांनी आरडाआोरड करुन सर्वांना जागे केले आणि आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळे आग नियंत्रणात येत नव्हती.

हेमराज हिवरे यांच्या घराच्या शेजारी अनिल तिमांडे यांच्या घरी असलेल्या पाण्याच्या मोटरच्या साहाय्याने आणि बादल्यांनी पाणी आणत नागरीकांनी ही आग नियंत्रणात आणण्यात मदत केली. ही आग नियंत्रणात आणताना सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटणकर हे किरकोळ जखमी झाले. तंटामुक्ती अध्यक्ष किरण गोमासे, मुकींद कळमकर, ऊमेश हजारे, कैलाश हजारे, विशाल हिवरे, हरी पाहुणे, अमोल थुल, सचिन उराडे, दिलीप रघाटाटे, रोषन रघाटाटे यांनी आग नियंत्रणात आणण्यास मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT