कापूस e sakal
विदर्भ

दिवाळीपूर्वीच उघडणार पणनचे केंद्र; खरेदी केंद्राचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे कापसाची उत्पादकता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चेतन देशमुख

यवतमाळ : भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा निर्णय घेतला. त्यामुळे सीसीआयकरीता सब एजंट म्हणून खरेदी करणार्‍या महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. २६) संचालकांच्या बैठकीत खरेदीसंदर्भात ठराव घेऊन तो शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून हमीभाव केंद्राचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टोलविण्यात येणार आहे.

संततधार पावसामुळे कापसाची झालेली बोंडसड तर काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे कापसाची उत्पादकता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशाअंतर्गंत प्रक्रिया उद्योगाची गरजही यातून भागणार नसल्याने सध्या कापसाच्या दरात तेजी आली आहे. हमीभाव सहा हजार २५ रूपयांच्या तुलनेत कापसाला सात हजार रूपयांपर्यंतचा दर मिळत आहे.

त्यामुळेच यंदा कापसाची आवक होणार नाही, या शक्यतेमुळे सीसीआयने हमीभाव केंद्र न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सीसीआयकरीता सबएजंट म्हणून पणन महासंघ खरेदी करतो. पणन महासंघाच्या खरेदीबाबतही यामुळे अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. दरम्यान पणन महासंघाच्या संचालक मंडळाची मंगळवारी (ता.२६) मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत यंदाच्या हंगामातील खरेदीवर मंथन होईल. बँक गॅरंटी तसेच शासन निधीची तरतूद झाल्यास हमीभावाने खरेदीचा निर्णय या बैठकीत होणार आहे.

महासंघाच्या संचालक मंडळांची बैठक मंगळवारी (ता.२६) होणार आहे. यावेळी कापूस खरेदीबाबतचा ठराव घेऊन शासनाला पाठविण्याचे प्रस्तावीत आहे. शासन त्यावर काय निर्णय घेते, त्यानंतरच हमीभाव केंद्रांची स्थिती स्पष्ट होईल. सीसीआयने खुल्या बाजारातून खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पणन महासंघाला खरेदी करावयाची झाल्यास शासन निधी किंवा बँक गॅरंटीशिवाय शक्य होणार नाही.

- अनंत देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ

पणन महासंघ शेतकर्‍यांचे हीत जोपासण्यासाठी स्थापन झाला आहे. किमान हमीभावापेक्षा कमी दर शेतकर्‍यांना मिळू नये म्हणून आमचा प्रयत्न असतो. आज सुदैवाने खासगी बाजारात कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार दर आहे. दिवाळीपूर्वी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा आमचा विचार आहे. पणन व सीसीआय मिळून १२४ केंद्र सुरू करण्याचे विचाराधीन आहे. पणन ५० तालुक्यात ५० केंद्र सुरू करेल.

- सुरेश चिंचोळकर, संचालक, पणन महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT