Martyr-Monument 
विदर्भ

हुतात्मा स्मारके टाकताहेत कात

रामेश्‍वर काकडे

वर्धा - देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गाजावाजा करीत शासनाने उभारलेल्या या स्मारकांची अतिशय दुरवस्था झाली आहे. मात्र, सदर स्मारकांच्या दुरुस्ती व सौंदर्यीकरणाच्या कामास सुरुवात झाल्याने राज्यासह विदर्भातील हुतात्मा स्मारके कात टाकत असल्याचे चित्र आहे.

शहिदांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी शासनाने राज्यात २०६ ठिकाणी हुतात्मा स्मारके बांधण्यात आली. परंतु त्यानंतर त्यांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक स्मारकांच्या भिंती कोसळू लागल्या, तर काही स्मारकांच्या छताला व दारांनाही तडे गेले आहेत. शासनाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षितपणामुळे स्मारकांसाठी निधीची तरतूद केली नसल्याने शहिदांच्या स्मारकांचे पावित्र्य धोक्‍यात आले होते. २००७ मध्ये राज्यातील बहुतांश स्मारकांची देखभाल करण्याची जबाबदारी खासगी संस्थांकडे सोपविण्यात आली.

त्यानंतर स्मारक परिसरात स्वच्छता, रंगरंगोटी आदी कामे करण्यात आली. मात्र, इतर सुविधा व सौंदर्यीकरणासाठी भरीव निधी नसल्याने त्यांची दुरवस्था झाली. सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून देत त्याचा पाठपुरावा केल्यानंतर शासनाने स्मारकांच्या पुनरुज्जीवनासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात १४ कोटी ७४ लाख ३९ हजार १३२ रुपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित करण्यात आलेला आहे. त्यातून स्मारकांचे विद्युतीकरण, मीटर रूम, स्वयंपाकघर, बेसिन, खिडक्‍या, फॉल्स सीलिंग, हॉल, पत्रे, सेप्टी ट्रॅंक, सोलरपंप, नादुरुस्त टाक्‍या बदलणे, पन्हाळे बसविणे, स्मारकांच्या फरबंदीमध्ये एकसमानता ठेवणे यांसह सौंदर्यीकरणाचे काम गतीने सुरू झाले आहे.

विदर्भात जिल्हानिहाय स्मारके आणि मंजूर निधी 
विदर्भात अमरावती दहा स्मारके ७२ लाख, बुलडाणा तीन स्मारके २१ लाख, यवतमाळ दोन-१४ लाख, अकोला एक-सात लाख, नागपूर एक-७९ लाख, वर्धा आठ-५७ लाख २५ हजार, भंडारा तीन-२१ लाख, गोंदिया तीन-२१ लाख, चंद्रपूर चार-२९ लाख, गडचिरोली एक-सात लाख अशी एकूण ३६ स्मारके असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात १४ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. 

वर्धा जिल्ह्यासाठी एक कोटी ४३ लाखांचा निधी
वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेवाग्राम, पेठ अहमदपूर, खरांगणा, खडकी, नरसापूर, वडाळी व आष्टी येथे अशी एकूण आठ स्मारके आहेत. वर्धा व सेवाग्राम येथील स्मारकांसाठी ७१ लाख तर इतर सहा स्मारकांसाठी ७२ लाख ५६ हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT