Baldness 
विदर्भ

`उमेद` कर्मचाऱ्यांचे सामूहिक मुंडण; केली कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुर्ननियुक्ती देण्याची मागणी

राहुल मैंद

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुर्ननियुक्ती देऊ नये, असे काढण्यात आलेले पत्र तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी उमेद कर्मचारी कल्याण मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता.५) पंचायत समितीसमोर सामूहिक मुंडण आंदोलन केले.

राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ४५ लाख कुटुंबांचे आधारवड ठरलेला केंद्र पुरस्कृत ‘उमेद’ अभियानाच्या अंमलबजावणीत कुठलाही बदल करू नये, चुकीचे आकलन करून कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसुबा हाणून पाडण्यासाठी जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सामूहिक मुंडण करून मुख्यमंत्र्यांना केस पाठविणार आहे. अभियानात कार्यरत विषयतज्ज्ञांमुळे सामाजिक उत्थानाचे कार्य करीत आहे. 

ग्रामस्तरापर्यंत वंचित घटकाची क्षमतावृद्धी हा अभियानाचा गाभा आहे. त्यासाठी जागतिक बॅंक, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व्यावसायिक मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आली. मनुष्यबळ विकास मार्गदर्शिकेनुसार अभियानाचे काम सुरू होते. मात्र, सरकारने हे अभियानच बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुर्ननियुक्तीचे आदेशही देण्यात आले नाही. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी सामूहिक मुंडण करून मुख्यमंत्र्यांचे घर असलेल्या ‘मातोश्री’वर केस दान करण्याचा निर्णय या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. 

सामूहिक मुंडण आंदोलनात अध्यक्ष प्रवीण भांडारकर, सचिव संतोष वाढई, मोहित नैताम, विवेक नागरे, दिनेश जांभूळकर, राऊत, अमिर पठाण, उद्धव मडावी, संगीता शिंदे, ज्योती साळवे, हेमचंद बोरकर, गोपिका येटे, सविता ऊईके, रितेश मारोतवार, सिद्धार्थ ढोणे, दीपक गायकवाड, प्रवीण सायंकार, शरद मसराम यांच्यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT