GMC, Akola 
विदर्भ

मेडिकलच्या 50 जागांचा प्रस्ताव एमसीआयकडू पुन्हा रिजेक्ट

शुभम बायस्कार

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) सध्या एमबीबीएसच्या 100 जागांची मान्यता असून, त्यामध्ये 50 जागा वाढवून मिळाव्यात, असा प्रस्ताव जीएमसीकडून एमसीआयकडे पाठविण्यात आला होता. मात्र कॉलेजमध्ये आवश्‍यक पदे मंजूर नसल्यामूळे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून हा प्रस्ताव रिजेक्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता वाढीव 50 जागांना मंजुरी मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाची कसोटी लागणार आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम तर नजिकच्या अमरावती जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे आवश्‍यक सोई-सुविधा निर्माण करण्याचे शासन-प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यातच मेडिकलमधून भावी डॉक्टर घडावे यासाठी येथील जागांची संख्याही भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने वाढवावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून अधिष्ठाता डॉ.शिवहरी व्ही.घोरपडे यांच्या नेतृत्वात एमसीआयकडे पाठपूरावा सुरू आहे. महाविद्यालयाला सध्या 100 जागांची मान्यता आहे. वाढवून ती 150 वर करण्यात यावी यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तेव्हा एमसीआयच्या तीन तज्ज्ञांकडून महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये फॅकल्टी व निवासी डॉक्टरांची डिफीसेन्सी ही अनुक्रमे 16 व 13 टक्के इतकी काढल्याने ऑगस्टमध्येही 150 जागांना मान्यता मिळू शकली नाही. ही डिफीसेन्सी 10 टक्केच्या आत असायला हवी. त्यानंतर पुन्हा मेडिकल कॉलेजने आवश्‍यक असणारे बदल करून एमसीआयच्या चमूला महाविद्यालयाची तपासणी करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये बोलविले. मात्र नोव्हेंबरमध्ये झालेल्या तपासणीमध्येही पदांचे प्रमुख कारण पुढे करीत वाढीव जागांचा प्रस्ताव भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून अमान्य करण्यात आला आहे. पण फॅकल्टीची डिफिसेन्सी ही 16 टक्क्यांवरून 14.89 टक्क्यांवर तर निवासी डॉक्टरांची 11.25 टक्क्यांवर आणण्यात महाविद्यालयाला यश आले आहे. त्यानंतरही वाढीव 50 जागांसाठी मान्यता मिळू शकली नाही. प्रवेश प्रक्रियेला अद्याप वेळ असल्याने नव्याने प्रस्ताव पाठवून मान्यता घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला पाठपुरावा करावा लागणार आहे. अन्यथा अकोल्याच्या मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकीचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी वाढीव जागांच्या प्रतीक्षेच राहण्याची शक्यता आहे.

सातत्याने पाठपुरावा
एमसीआयकडून 150 जागांना कायमस्वरूपी मान्यता मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र पदे मंजूर नसल्याने अडचण येत आहे. त्यामुळे अद्याप मंजूरी मिळाली नाही. मात्र डिफीसेन्सी कमी करण्यात महाविद्यालयाला यश आले आहे.
-डॉ.शिवहरी व्ही.घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

वाढीव जागांना मान्यता मिळाली तर प्रवेश
प्रवेशप्रक्रीया सुरू होईपर्यंत वाढीव जागांना मान्यता मिळाली तर प्रवेश होतील. मात्र यासंदर्भात अद्याप काही सांगता येणार नाही.
-डॉ.कुसुमाकर घोरपडे, उपअधिष्ठाता (शैक्षणिक), जीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT