Medieval Gadhegal Inscription found on Poos Tira yavatmal Sakal
विदर्भ

Yavatmal News : पूस तीरावर आढळला मध्ययुगीन ’गधेगळ’ शिलालेख

पूस नदी तीरावर मुखरे बांधाजवळ मध्ययुगीन काळातील ’गधेगळ’ शिलालेख आढळून आल्याने इतिहास अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : पूस नदी तीरावर मुखरे बांधाजवळ मध्ययुगीन काळातील ’गधेगळ’ शिलालेख आढळून आल्याने इतिहास अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुसद येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर माहुरे बुधवारी (ता. ८) सकाळी मॉर्निंग वॉक करताना हा शिलालेख त्यांच्या निदर्शनास आला.

पूस नदी तीरावरील कुस्ती हौदाजवळ तो कचऱ्यासोबत अडगळीत पडलेला होता. त्याचे छायाचित्र काढून गुगल वरून सर्च करीत त्यांनी हा शिलालेख ऐतिहासिक नोंदीनुसार ’गधेगळ’ असल्याची माहिती मिळवली. मध्ययुगीन काळातील हा प्राचीन शिलालेख आढळल्याने इतिहास प्रेमींमध्ये खळबळ उडाली.

हा शिळालेख चार फूट उंचीचा असून वरच्या बाजूवर ’सूर्य’ आणि ’चंद्र’ यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. खालच्या भागात समागम करणारे गाढव अस्पष्टपणे दाखवले आहे. मध्ययुगीन शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत,

तर तेव्हाची सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थितीही कथन करतो. यापैकी एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा म्हणजे हा शिलालेख आहे. दहाव्या शतकात शिलाहार राजांच्या महाराष्ट्रातील राजवटीत हा शिलालेख निर्माण झाला असल्याचे मत आहे.

हा गधेगळ शिळालेख केवळ एक लिखित पुरावाच नाही तर, राजाच्या आज्ञेची भीती घालणारा आणि त्याकाळातील महिलांचे सामाजिक स्थान दर्शवणारा एक स्तंभ असल्याचे मानले जाते. संशोधकांच्या मते अशी प्रतिमा असलेल्या शिलालेखाला ’गधेगळ’ हे नाव पडले आहे.

शिलालेखामध्ये लिहिलेली माहिती अथवा आज्ञा जे कोणी पाळणार नाहीत, त्यांच्या सोबत असे कोणते कृत्य केले जाईल, अशी ती धमकी आहे.तर या गधेगळांवर असलेल्या चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमेबद्दल ‘आ चंद्र, सूर्य नांदो.’,म्हणजे चंद्र आणि सूर्य अस्तित्वात असेपर्यंत ही आज्ञा कायम राहील, म्हणून यावर चंद्र, सूर्य कोरलेले असतात‘, असा अन्वयार्थ काढण्यात येतो.

गधेगळांवर लिहिलेली राजाज्ञा मोडली तर तुमच्यावर कारवाई करण्याचा संदेश असल्याचे सांगण्यात येते.या प्रकारचे अन्य शिलालेख परिसरात विखुरले असावेत, असा अंदाज असून दगडावर कोरलेल्या या शिलालेखाचा पुरातत्व विभागाने अभ्यास करावा व अडगळीत पडलेल्या शिलालेखाचे जतन करण्यात यावे, अशी इतिहास प्रेमींकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT