sironcha 
विदर्भ

अभिनंदनीय! खर्रा व दारूमुक्त गावासाठी पोलिस पाटलांचाच पुढाकार!

मिलिंद उमरे

सिरोंचा (गडचिरोली) : येथील पोलिस स्टेशन व मुक्तिपथ यांच्या संयुक्त विद्यमाने खर्रा व दारूमुक्त तालुका करण्यासाठी तालुक्‍यातील ११ गावांतील पोलिस पाटलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावातील पानठेले सुरू होऊ नये व दारूविक्रीवर अंकुश घालण्यासाठी चर्चा करण्यात आली. तहसीलदारांच्या पत्रानुसार पोलिस पाटील यांनी पुढाकार घेऊन खर्रा व दारूमुक्त गाव करण्याचे आवाहन केले.

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकण्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होतो. त्यामुळे राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घातली आहे. तरीसुद्धा चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू आहे. जिल्ह्यात दारूबंदी लागू असूनसुद्धा अवैध दारूविक्री सुरू आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व तेलंगणा राज्य सीमेवरील सिरोंचा तालुक्‍यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. यावर नियंत्रण ठेवून खर्रा व दारूमुक्त तालुका करण्यासाठी पोलिस विभाग व मुक्तिपथ अभियानाने पुढाकार घेतला आहे.

यासाठी तालुकाभरातील पोलिस पाटलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये खर्रा व दारूमुक्त गाव करण्यासाठी चर्चा करण्यात आली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार यांनी पत्र काढून अवैध व्यवसायावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी गाव पातळीवर ग्रामसेवक, सरपंच व पोलिस पाटील यांचे पथक तयार केले आहे.

सविस्तर वाचा - ओळख करून घ्या काही खास पारंपरिक दागिन्यांची

या माध्यमातून गावातील पानठेले पुन्हा सुरू करू द्यायचे नाही. गावात दारूविक्रीवर अंकुश लावा. बाहेरून दारू येत असल्यास त्यांना पकडून पोलिसांना माहिती द्या, अशी माहिती पोलिस पाटील यांना सिरोंचाचे पोलिस निरीक्षक अजय अहिरकर व मुक्तिपथ तालुका संघटक सुनीता भगत यांनी दिली. तसेच तहसीलदार यांचे पत्र पोलिस पाटलांना देण्यात आले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत दारू व तंबाखूमुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय पोलिस पाटलांनी घेतला आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

SCROLL FOR NEXT