file photo
file photo 
विदर्भ

काय राव? निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सिनेट सदस्यांची बैठक 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची बैठक गुरुवारी (ता. 24) होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल अन्‌ सिनेटची बैठक एकाच दिवशी आल्याने सिनेटच्या सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे ही बैठक पूर्वी 21 ऑक्‍टोबरला होणार होती. परंतु, निवडणुकांची घोषणा झाली अन्‌ विद्यापीठाने सभा तहकूब करून ती 24 ऑक्‍टोबरला घेण्याचा निर्णय घेतला. 
विद्यापीठाच्या सिनेटमध्ये राजकीय पक्षाचे समर्थक असतात. निवडणुकांच्या वेळी ते प्रचार आणि इतर कामांमध्ये सक्रिय असतात हे सर्वश्रृत आहे. अशा स्थितीत अनेक सदस्य बैठकीला गैरहजर राहतील ही बाब विद्यापीठाला ज्ञात आहे. तरीही विद्यापीठाने सिनेटची बैठक 24 ऑक्‍टोबरला घेण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत गैरहजर राहणाऱ्यांची संख्या अधिक राहिली तर अनेक प्रकरणे चर्चेशिवाय राहतील, अशी भीती सदस्यांनी व्यक्‍त केली आहे. दुसरीकडे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी राज्यपालांच्या परवानगीनेच 24 तारखेला सिनेटची बैठक घेल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या निकालात सहभाग नोंदवायचा की, सिनेटच्या बैठकीत सहभाग घेऊन समस्यांना वाचा फोडायची हा पेच सदस्यांपुढे उभा ठाकला आहे. 

विधिसभेच्या बैठकीची तारीख राज्यपाल कार्यालयाकडून निश्‍चित होते. त्यानुसारच 24 ऑक्‍टोबरला बैठक जाहीर करण्यात आली. समोर दिवाळी असल्याने बैठकीसाठी तारीख ठरवण्यात अडचण झाली. 
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT