Strawberry sakal
विदर्भ

मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना चटक; हिवाळ्यात मागणी वाढली

मेळघाटच्या आदिवासी बांधवांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. येथील स्ट्रॉबेरीची चटक आता पर्यटकांनाही लागली आहे.

नारायण येवले

चिखलदरा (जि. अमरावती) : महाबळेश्वरच्या धर्तीवर चिखलदरा तालुक्यातील मोथा व आलाडोह गावात मागील काही वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात येत आहे. मेळघाटच्या आदिवासी बांधवांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. येथील स्ट्रॉबेरीची चटक आता पर्यटकांनाही लागली आहे.

स्ट्रॉबेरीचे नाव घेतले की, महाबळेश्वर नजरेसमोर येते. चिखलदरा आणि महाबळेश्वर या दोन ठिकाणांच्या वातावरणात भौगोलिकदृष्ट्या बरेच साम्य आहे. सुरुवातीला मातीपरीक्षण करून प्रायोगिक तत्त्वावर या ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली. त्यानंतर शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली.

आता हेच शेतकरी स्वखर्चाने स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहेत. मोथा व आलाडोह गावातील स्ट्रॉबेरीची ही शेती पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. स्ट्रॉबेरी म्हटले की, लालबुंद गोड आणि दिसायला छान, असे हे फळ खायला आणि हातात घ्यायची हौस पर्यटक आवरू शकत नाहीत. विदर्भातील पर्यटकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी ठरत आहे.

विदर्भातील जे पर्यटक महाबळेश्वरला जाऊ शकत नाहीत, ते चिखलदरा तालुक्यातील मोथा व आलाडोह या दोन गावांतच महाबळेश्वरचा आनंद घेऊ शकतात. कित्येकांना तर मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची चटक लागली आहे. स्ट्रॉबेरीचा हंगाम हा हिवाळ्यात असतो. या हंगामात पर्यटक स्ट्रॉबेरीसाठी या ठिकाणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बरेच उत्पन्न मिळत आहे.

पीकविम्यात स्ट्रॉबेरीचा समावेश करा

शासनातर्फे सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा यासह अन्य पिकांचा समावेश पीकविम्यात करण्यात आला आहे. नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळते. मात्र, स्ट्रॉबेरीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर प्रचंड संकट कोसळते. त्यामुळे स्ट्रॉबेरी फळपिकाचा पीकविम्यात समावेश करावा, अशी मागणी मोथा येथील शेतकरी साधुराम पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT