उमरेड : सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले चोरटे.  
विदर्भ

 व्यापाऱ्यावर हल्ला करून साडेआठ लाख पळविले 

सकाळ वृत्तसेवा

उमरेड (जि.नागपूर):  सोमवारी उमरेड शहरात सकाळी साडेअकराच्या सुमारास युनियन बॅंकेत ठेवी जमा करण्यासाठी गेलेल्या युवा व्यावसायिकांवर काही चोरांनी पाळत ठेवून हल्ला चढविला. चाकूने वार करून साडेआठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. 
स्थानिक नामांकित किराणा व्यापारी नीलेश महेश तोलानी (वय 30, सिंधी कॉलनी उमरेड) यांचे व्यावसायिक कार्यालय खाती कामठी चौक परिसरात असून ते ठेवी जमा करण्याच्या उद्देशाने आठ लाख 53 हजार रुपयांनी भरलेली बॅग घेऊन दुचाकीने काही अंतरावर असलेल्या इतवारी बाजारपेठेतील युनियन बॅंकेच्या दिशेने निघाले. घटनेची चित्रफीत बॅंकेच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्यामुळे त्यानुसार ते बॅंकेजवळ पोचतात बॅग घेऊन जिना चढायला सुरुवात केली. तेवढ्यात मागावर असलेले तीन अज्ञात चोर व आधीच जिन्यावर चढून तयार असलेला एक अशा तिघांनी नीलेशवर क्षणार्धात चाकूने सपासप वार करून बॅग हिसकावून दुचाकीने धूम ठोकली. शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरटे कैद झाले असून फोटो व व्हिडिओ प्रसारमाध्यमांद्वारे व्हॉट्‌सऍपमधून व्हायरल झाला. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला नसल्याचे समजले. याशिवाय विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे त्यात गुंतलेले पोलिस प्रशासन या घटनेमुळे सतर्क झाले असून पोलिस यंत्रणा तपासात लागल्याचेही समजले. पीडित व्यवसायिक नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून समजले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained : शिंदेंना ठाकरेंचे खासदार फोडण्याची गरज का भासली? पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? थेट मुद्दा समजून घ्या...

Prithviraj Chavan: सहकाराचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी: पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा कारखान्यात परिवर्तनाची हाक, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Kolhapur Wrestler Death : भिंतीवर खुरपे मारताना विजेच्या तारेला हात लागला अन्; १३ वर्षीय पैलवानाबाबत घडली हृदयद्रावक घटना

Who is Yoane Wissa? रोनाल्डोच्या पोर्तुगालला रडवणाऱ्या योआन विसावर झालेला अ‍ॅसिड हल्ला! मृत्यूच्या दारातून प्रेरणादायी पुनरागमन

Monsoon Active Again : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मॉन्सून पुन्हा होणार सक्रीय, पुढच्या चार दिवसात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT