Meteor-Shower
Meteor-Shower 
विदर्भ

आता आकाशात चार दिवस दिवाळी!

सकाळवृत्तसेवा

अमरावती - येत्या १७ ते २० नोव्हेंबर या काळात सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. त्यामुळे आकाशमंडलात चार दिवस दिवाळीसारखे वातावरण राहणार आहे. या उल्का वर्षावाचे लिओनिडस हे प्रसिद्ध नाव आहे. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना एखाद्या वेळी क्षणार्धात एखादी प्रकाशरेषा चमकून जाताना आपणास दिसते. या घटनेस तारा तुटला असे म्हटले जाते. खरे पाहता ही प्रकाशरेषा दुसऱ्या ताऱ्याची नसते. ती एक आकाशात घडणारी खगोलीय घटना आहे. तारा कधीही तुटत नसतो.

या घटनेला उल्का वर्षाव असे म्हणतात. १७, १८ व १९ च्या पहाटे उल्का वर्षावाची शक्‍यता जास्त राहील. उल्का वर्षावाची तीव्रता निश्‍चित तारीख व वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नाही. निरीक्षणाची तयारी आणि सोशीकता असलेल्यांनीच उल्का पाहण्याचा प्रयत्न करावा. पडले घराबाहेर आणि भराभर उल्का पडताना दिसल्या, अशी अवास्तव कल्पना करून घेऊ नये. उल्काचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाच्या शास्त्रीय नोंदी याची खगोल जगतात खूप गरज आहे.

धुमकेतू सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असताना त्यातील काही भाग मोकळा होतो, हे धूमकेतूने मागे टाकलेले अवशेष होय. या उल्का एखाद्या तारका समूहातून येत आहेत, असे वाटते. तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातील एखाद्या भागातून पडत असतील तर त्यास उल्का वर्षाव असे म्हणतात. काही वेळा गतिमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना त्या घनरूप अवस्थेत पृथ्वीवर येतात तेव्हा त्यास अशनी असे म्हणतात. 
उल्काशास्त्रात अशनीचे स्थान फार मोठे आहे. बाह्य अवकाशातील वस्तूचे नमुने या अशनीमुळे आपणास मिळतात. त्यामुळे वस्तूच्या जडणघडणीचा अर्थ आपणास लावता येतो. ज्यावेळी एखादी उल्का आपणास पडताना दिसते.

या संदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा खूप आहेत. परंतु अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कोठेही आधार नाही. सिंह तारकासमूहातून होणारा हा उल्का वर्षाव टेम्पलटटल या धुमकेतूच्या अवशेषामुळे होतो. हा धुमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो.

मध्यरात्रीनंतर वर्षाव
उल्का वर्षाव अगदी साध्या डोळ्यांनी आपल्याला मध्यरात्रीनंतर घराच्या गच्चीवरून किंवा शहराबाहेर जाऊन अंधारातून पाहता येईल. खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृश्‍य अवश्‍य बघावे, असे आवाहन विजय गिरूळकर व प्रवीण गुल्हाने यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT