Sironcha sakal
विदर्भ

Migration : सिरोंचा तालुक्यातील ३३४ पूरपीडितांचे शेल्टर होममध्ये स्थलांतर

गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. २७) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. अतिवृष्टी झाल्याने सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - जिल्ह्यात शुक्रवार (ता. २७) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. अतिवृष्टी झाल्याने सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने जलद कार्यवाही करत पूरग्रस्त भागांतील ३३४ नागरिकांना सुरक्षित स्थळी शेल्टर होममध्ये स्थलांतरीत केले आहे.

गोदावरी नदीच्या पूरात अडकलेल्या व पुरामुळे धोका होऊ नये, अशा संभाव्य गावातील लोकांसाठी जिल्हा प्रशासनाने शेल्टर होम तयार केले आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा प्रशासनाने पूरपीडित ३३४ लोकांना या शेल्टर होममध्ये स्थलांतरीत केले आहे. येथे त्यांच्यासाठी निवास, अल्पोपहार व जेवणाची सुविधा जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे.

सिरोंचा तालुक्यात एकूण ५८ शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक शेल्टर होममध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरपंच व उपसरपंच याप्रमाणे ५८ पथक तयार करण्यात आले आहेत. शुक्रवारी सिरोंचा तालुक्यातील नगरम, मुगापूर, जानमपल्ली व सिरोंचा (रै.) येथील पूरबाधित लोकांना शेल्टर होममध्ये हलविण्यात आले आहे.

त्यामध्ये नगरम येथील २४० लोकांना सिरोंचातील शासकीय आश्रमशाळेतील शेल्टर होममध्ये, मुगापूर व जानमपल्ली येथील ९० लोकांना सिरोंचातील राजीवनगर येथील कार्मेल हायस्कुलमध्ये व सिरोंचा (रै.) येथील ४ लोकांना जिल्हा परिषद हायस्कुल येथील शेल्टर होममध्ये आणण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाद्वारे नागरिकांच्या निवासाची, अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येत आहे. याशिवाय तालुक्यात एस.डी.आर.एफ. चे एक पथक आणि सी.आर.पी.एफ. चे ५० जवान मौक्यावर तैनात आहेत. तसेच लाइफ जॅकेट, लाईफ बोट, मेगाफोन व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत लागणारे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व पूरबाधित गावांमध्ये आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT