संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

इज्जत वाचविण्यासाठी तिने घेतला रुद्रवतार आणि मग काय घडले?

सकाळ वृत्तसेवा

 अमरावती : आपली आणि बहीणीची इज्जत वाचविण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यात एक युवक जखमी झाला. तो युवक जखमी झाला असला तरी आक्रमक पवित्रा घेतल्यानेच त्या मुलीचे इज्जत वाचू शकली.

सध्या जिल्ह्यात विविध ठिकाणी छेडखानीच्या घटना वाढत आहेत. काही ठिकाणी छेडखानी करणाऱ्यांना धडा शिकविल्या जातो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात छेडखानीला त्रासलेल्या मुलीने बचावासाठी, भिरकावलेला दगड छेडखानी करणाऱ्याच्या डोक्‍यात बसल्याने तो जखमी झाला. गोपाल सरकटे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. 14 वर्षीय मुलगी तिच्या चुलत बहिणीसोबत आजीच्या घराकडे पायदळ जात असताना, शासकीय रुग्णालयाजवळ सरकटे याने दोघींचा पाठलाग केला. दोघी बहिणी जिवाच्या आकांताने धावत पुढे निघाल्या. परंतु पाठलाग करणाऱ्याने त्या अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळ अडवून, बळजबरीचा प्रयत्न केला. मोठ्या बहिणीची छेडखानी होत असताना, चिमुकली रडत होती. अल्पवयीन मुलीने सरकटेच्या हाताला झटका देऊन स्वत:ची सुटका करून घेतली. परंतु त्याने पुन्हा दोघींचा पाठलाग सुरूच ठेवल्याने स्वत:च्या बचावासाठी पीडितेने (वय 14) एक दगड उचलून पाठलाग करणाऱ्याच्या दिशेने भिरकावला, तो दगड त्याच्या डोक्‍यावर बसून तो जखमी झाला.

घरी येऊन पीडितेने पालकांजवळ घटनेची माहिती दिली. पालकांनी अखेर खल्लार ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यावरून सरकटेविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, युवतीच्या छेडखानीची दुसरी घटना धारणी परिसरात घडली. संशयित शेख फरीद शेख नजीर (वय 31, रा. कळमखार) याचे लग्न झाले असून, त्याला एक सात वर्षाची मुलगीही आहे. ही बाब त्याने लपवून ठेवली. त्यामुळे युवतीने शेख फरीदला न भेटण्याबाबत बजावले. त्यानंतरही त्याने युवतीला एसएमएस करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अडविले. लग्न करण्याची मागणी केली. पीडितेने नकार देताच, शेख फरीदने बळजबरीचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून धारणी ठाण्यात शेख फरीदविरुद्ध विनयभंगासह ऍट्रॉसिटी ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT