minor girl physical abused in belora of amravati 
विदर्भ

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

कृष्णा लोखंडे

बेलोरा (जि. अमरावती): अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्या मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा गावात घडली असून मुलीवर सध्या इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिरीष बंड (वय 28), असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, शिरीषने पीडितेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. वारंवार भेटी घेऊन त्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. 11 ऑक्‍टोबरला पीडितेची प्रकृती बिघडल्यामुळे पालकांनी तिला उपचारासाठी चांदूरबाजारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी पीडित गर्भवती असल्याचे समजले. पीडितेच्या आईने शिरीषला जाब विचारला असता त्याने अल्पवयीन मुलीवर ओढवलेल्या प्रसंगाला आपण जबाबदार नसल्याचे सांगितले. मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला आधी इर्विन रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात हलविले. तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी शिरीष बंडविरुद्ध अत्याचारासह, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

पीडितेसह तिच्या आईला तक्रार नोंदविण्यासाठी आधीच सांगितले होते. गुन्हा दाखल झाल्याने आवश्‍यक पुढील तपास केला जाईल. 
- दीपक वळवी, पोलिस निरीक्षक, चांदूरबाजार ठाणे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT