missmanagement of government medical college akola 
विदर्भ

पास प्रणालीला ‘सर्वाेपचार’चा खाे !

प्रवीण खेते

अकाेला - प्रभावी रुग्ण सेवा अन् सुरळीत व्यवस्थापनासाठी ता. १ मेपासून सर्वाेपचारमध्ये पास प्रणाली राबविण्यात येणार हाेती. मात्र, अद्यापही या प्रणालीचा अवलंब करण्यात आला नसून, रुग्णांना भेटण्याची वेळ पाळल्या जात नसल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत समाेर आले.

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ता. १ मे पासून पास प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील नियाेजन आणि रुग्णसेवेत बदल घडणे अपेक्षित होते. हा अपेक्षित बदल झाला किंवा नाही? पास प्रणाली यंत्रणा सक्षमपणे काम करते आहे का? या प्रश्नाची उकल करण्यासाठी ‘सकाळ’ने मंगळवारी (ता. २२) सर्वाेपचारमध्ये काही निवडक वार्डांची परिस्थिती जाणून घेतली. या ठिकाणी रुग्णांना भेटण्यापूर्वी नातेवाईकांची नाेंदणी अाणि त्यांना पास देणे अपेक्षित हाेते. येथे कुणीही या नियमांचे पालन करताना आढळले नाही. थेट रुग्णांना भेटण्यासाठी जाणारे नातेवाई आढळून आले. वार्ड क्रमांक सहा मधील परिचारीकेला पास बद्दल विचारले असता, त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. दुसऱ्या वार्डात ही सेवा अद्याप सुरू व्हायची असल्याचे सांगण्यात आले.

अशी आहे पास प्रणाली

  • पिवळी पास - रुग्ण भरतीझाल्यापासून तीन दिवसांची वैधता. तीन दिवसानंतर रुग्णाला जास्त दिवस थांबायचे असल्यास पासची वैधता वाढवून देण्यात येणार हाेती.
  • गुलाबी पास - रुग्णांना भेटीसाठी येणाऱ्या दाेघांना प्रत्येकी एक पास देणे अपेक्षीत आहे. गुलाबी पासवर रुग्णांना भेटण्यासाठी फक्त ४ ते ५ वाजताची वेळ निश्चित केली आहे. पासची वैधता तीन दिवस आहे.

परिणाम - 

  • नातेवाईकांची गर्दी वाढली.
  • अस्वच्छता वाढली आहे.
  • सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न कायम.
  • रुग्णसेवा प्रभावीत.
  • नियाेजन काेलमडले.
  • रुग्णांना मनस्ताप.

पास प्रणालीवर काम सुरू असून, ता. १ जूनपासून प्रत्यक्षात राबविण्यात येईल. - डॉ. अजय केवलीया, अधिष्ठाता, जीएमसी, अकाेला

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation:'जेवण घेऊन जाणारी वाहने पोलिसांनी रोखली'; मुंबई येथे माजी आमदार विक्रम सावंत, पोलिसांच्यामध्ये वाद

१९ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! न्यूझीलंडच्या यष्टिरक्षकाची रेकॉर्ड ब्रेकींग फटकेबाजी; आंद्रे रसेलच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कोण? ‘भोसले’ आडनावामागची खरी कहाणी काय?

Sangli News:'शेळ्या राखण्यास गेलेल्या महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू'; खैराव येथील दुर्दैवी घटना, सात तासांनंतर मृतदेह विहिरीतून बाहेर

Yogesh Alekari Video : जगसफारीचे स्वप्न भंगले! मुंबईच्या बाईकरची गाडी लंडनमधून गेली चोरीला, इमोशनल व्हिडिओ केला शेयर

SCROLL FOR NEXT