MLA Devendra Bhuyar, yashomati thakur sakal
विदर्भ

MLA Devendra Bhuyar : आमदार भुयार यांचे वादग्रस्त वक्तव्य, महिलांचा अपमान केल्याचा आरोप

MLA Devendra Bhuyar controversial statement : आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले असून त्यांच्यावर महिलांचा अपमान केल्याचा आरोप झाला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

वरुड : मोर्शी-वरुड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत असून विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यामुळे राज्यात या विषयाचे पडसाद उमटण्याचे संकेत आहेत.

मुलगी जर पाहायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्याला मिळत नाही. ती नोकरीवाल्या मुलालाच मिळते. दोन नंबरची डोंबळी मुलगी पानटपरी, किराणा दुकानदाराला मिळते. तीन नंबरचा गाळ जो राहिला तो शेतकऱ्याच्या पोट्ट्याला भेटते. जन्माला येणार जे लेकरू आहे ते हेंबाळ निघत राहते.

माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानरांचे पिल्लू, असाच कार्यक्रम आहे असे वक्तव्य आमदार देवेंद्र भुयार यांनी एका ठिकाणी केले. त्यामुळे त्यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक असल्याने विरोधकांनी या मुद्द्यावर देवेंद्र भुयार यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तसेच अमरावतीच्या माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आ. भुयार यांच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्याठिकाणी अजित पवार यांचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो, त्याच ठिकाणच्या आमदारांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे दिसून येते.

महिला ही जननी आहे, तुम्ही त्याचे वर्गीकरण करू शकत नाही, ती संसार चालवत असते. महिलांच्या मतासाठी तुम्ही जीवाचं रान करीत आहात व दुसरीकडे महिलांचे वर्गीकरण करून महिलांचा अपमान करीत आहात. त्यामुळे तुमची मानसिकता काय आहे ते समजत आहे, अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र भुयार यांचा समाचार घेतला.

अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना नियंत्रणात ठेवावं, अशाप्रकारे महिलांचे वर्गीकरण कोणीही खपवून घेणार नाही. तुम्हाला संसार आणि समाज धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

-अॅड. यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा.

मी शेतकऱ्यांची कैफियत मांडली. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील मुलताई येथील एका शेतकरी मेळाव्यातील आहे. विरोधक जुने व्हिडिओ काढून विपर्यास करत आहे. केवळ राजकीय द्वेषातून हा व्हायरल केला गेला आहे. तरी माझ्या सदर विधानांनी माझ्या माय मावळ्यांचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

-देवेंद्र भुयार, आमदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : योगी सरकारचा मोठा निर्णय

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT