विदर्भ

आमदार भांगडियांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा; काँग्रेस भाजप आमनेसामने

जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : १६ ऑगस्ट चिमूर क्रांती शहीद स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्री विजय वडेट्टीवार महामार्गानजीक असलेल्या हुतात्मा स्मारक येथे शहिदांना मानवंदना देऊन मनोगत व्यक्त करीत होते. दरम्यान, आमदार भांगडिया यांच्या नेतृत्वात निघालेली बाईक रॅली या ठिकाणी पोहोचली. मोठ्याने घोषणा देत रॅली थांबली. यामुळे भाजप व काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला. विनापरवानगी बाईक रॅली काढल्याने आमदार किर्तीकुमार भांगडियासह आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली.

चिमूर क्रांती शहीद स्मृतीदिनानिमित्त शहिदांना मानवंदना देण्यासाठी राज्याचे बहुजन कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा नियोजित शासकीय दौरा होता. नियोजित कार्यक्रमानुसार चिमूर महामार्ग नजीकच्या हुतात्मा स्मारक येथे मंत्री विजय वडेट्टीवार हे मनोगत व्यक्त करीत होते. दरम्यान, आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात बाईक रॅली नेहरू चौकातून हुतात्मा स्मारक पुढे आली. तिथून पुढे न जाता मोठ्याने जिल्ह्यासंबंधी तथा इतर घोषणा देणे सुरू केले.

यामुळे काही काँग्रेस कायकर्त्यांनी रॅली पुढे घेऊन जाण्याचे सांगितले. यामुळे भाजप कार्यकर्ते संतापल्याने मोठा तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही समूहांना दूर नेले. केंद्र, राज्य व सर्वौच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशाप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत कोणत्याही गर्दी होणाऱ्या राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक निवडणूक प्रचार, सभा रॅली मोर्चे यावर बंदी घालण्यात आली आहे. याउपर विना परवानगी बाईक रॅली आमदार भांगडियांच्या नेतृत्वात काढण्यात आली.

पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या दिशानिर्देश व आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. असा ठपका ठेवून आमदार बंटी भांगडिया, गोलू भरडकर, अजित सुकारे, राजू देवतळे, विवेक कापसे, नैनेश पटेल, कन्हैयासिंग भौंड, पिंटू ऊर्फ विशाल खाटीक, स्वप्निल शेंडे या नऊ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इतर ३० व्यक्तींची ओळख करणे सुरू आहे. गुन्हा नोंदविलेल्या व्यक्तींची संख्या चौकशी अंती वाढू शकते अशी माहिती साहाय्यक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT