ओगले कुटुंबीयांशी चर्चा करताना आमदार जोरगेवार 
विदर्भ

जातपंचायतींच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जातपंचायतीच्या बहिष्कारामुळे अंत्यसंस्काराला समाजातील कुणीच न आल्याने सात मुलींनीच वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ७) शहरातील भंगाराम वॉर्ड येथे उघडकीस आली. मंगळवारी (ता. ८) आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी ओगले कुटुंबीयांची भेट घेतली. जातपंचायतींच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी पोलिस अधीक्षकांना केल्या आहेत. (MLA-Kishor-Jorgewar-said-Take-legal-action-against-the-people-of-Jat-Panchayat)

पंधरा वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार त्यांच्या मृत्यूनंतरही पुन्हा एकदा आड आला. गोंधळी समाजातील प्रकाश ओगले यांना ७ मुली आणि २ मुलं आहेत. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रमांना जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला व आर्थिक दंड लावला. मात्र, प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही. त्यामुळे गोंधळी समाजाने त्यांच्या कुटुंबीयावर बहिष्कार टाकला. अशातच रविवारी (ता. ६) त्यांचा मृत्यू झाला.

जातपंचायतीने बहिष्कार घोषित केल्यामुळे त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी समाजातील कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर सात मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला होता. या प्रकाराची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी मंगळवारी ओंगले कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबाची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आर्थिक मदत केली. या कुटुंबातील जयश्रीला उच्च शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन आमदार जोरगेवार यांनी दिले. या घटनेबाबत विधानसभेत प्रश्न मांडणार असून अशी विदारक परिस्थिती अन्य कुठल्याही कुटुंबावर येऊ नये, म्हणून सामाजिक जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

(MLA-Kishor-Jorgewar-said-Take-legal-action-against-the-people-of-Jat-Panchayat)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT