MLA Ravi Rana's corona report positive 
विदर्भ

पहिले मुलं, नंतर खासदार आता आमदार; राणा कुटुंबीयच कोरोनाबाधित

सुरेंद्र चापोरकर

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील दहा सदस्य चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणाही बाधित झाल्या. कुटुंबातील एकमेव उरलेले आमदार रवी राणा यांचा अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याचे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे राणा कुटुंब कोरोनाबाधित झाले आहे.

चार दिवसांपूर्वी राणा कुटुंबातील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नवनीत आणि रवी राणा दोघेही कुटुंबीयांकडे लक्ष देण्यात व्यग्र होते. नवनीत राणा अमरावतीला तर रवी राणा नागपूरला आई-वडिलांच्या सेवेत होते. नवनीत राणा यांना काल अस्वस्थ वाटत असल्याने तपासणी करण्यात आली. त्यांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट आणि थ्रोट स्वॅब घेण्यात आले.

रॅपिड टेस्टमध्ये नवनीत यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. इकडे नागपूरला माता-पित्याची सेवा करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी न करणारे आमदार रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीन डॉक्टर शैजल मित्रा यांच्या देखरेखीखाली त्यांची तपासणी झाली. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. आता आमदार रवी राणांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जात आहे.

काल नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली. रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट व थ्रोट स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये खासदार नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आमदार रवी राणा यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या सुमारे ५५ जणांच्या घशातील स्वॅब घेण्यात आले होते. त्यात आमदारांच्या वडिलांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आईचासुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. आई, वडील, बहीण, जावई, पुतण्या, दोन भाच्या, दोन मुले व एका अंगरक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

स्वतःहून तपासणी करून घ्या
आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी. लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार करून घ्या.
- रवी राणा, आमदार

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update : राहुरीत आठव्या फेरीनंतर असा कल समोर, विरोधकांना बसला मोठा धक्का

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Pune Crime : पुण्यात सासऱ्याकडून सुनेची हत्या, ६ महिन्यांच्या बाळासमोरच भिंतीवर डोकं आपटलं अन्...

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

SCROLL FOR NEXT