file photo 
विदर्भ

मोबाईलने केले सर्वसामान्यांच्या "कॉइन बॉक्‍स'ला हद्दपार...वाचा

शुभम शहारे

चिखली (जि. गोंदिया) : ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांचा समजला जाणारा कॉइन बॉक्‍स मोबाईलच्या वाढत्या प्रसारामुळे आता हद्दपार झाला आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर एक रुपयात कॉइन बॉक्‍सची सेवा मिळत होती.

किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, झेरॉक्‍स सेंटर, एसटीडीतून कॉइन बॉक्‍सच्या माध्यमातून मोठी उलाढाल होत होती. उत्पन्नाचे साधन म्हणून कमी खर्चाच्या कॉइन बॉक्‍सकडे नव व्यावसायिकाचा कल होता. आता मात्र हे दिवस लयास गेले आहेत.

डबल सिमचा लाभ

कॉइन बॉक्‍सची जागा आता मोबाईलने घेतली आहे. मोबाईलचा अतिप्रसारामुळे व सुलभतेमुळे आता हे कॉइन बॉक्‍स हद्दपार झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील घराघरांत मोबाईल पोहोचल्याने कॉइन बॉक्‍स कालबाह्य झाले आहे. मोबाईलमध्ये डबल सिम मिळत असल्याने एकाला रेंज नसली; तरी लगेच दुसऱ्या सिमवर काल करता येणे सहज शक्‍य झाले आहे.

मोबाईलचा वापर गरजेपुरताच

सन 1995 मध्ये भारतात मोबाईलने पाय रोवण्यात सुरुवात केली. मात्र, इनकमिंग व आउटगोइंग कालरेट अधिक असल्याने मोबाईलचा वापर गरजेपुरताच होत होता. घरातील कर्त्या माणसाला संपर्क करावयाचा झाल्यास घराशेजारील किराणा दुकानातून एका रुपयात कॉइन बॉक्‍सवरून फोन करण्याची प्रथा होती. एका रुपयात कुठेही बोलता येत असल्याने ग्रामीण भागात कॉइन बॉक्‍सची मोठी क्रेझ होती. पता ती कालबाह्य झाली आहे.

लहान मुलांनाही होती सुविधा

घरातील लहान मुलेदेखील शेजारच्या किराणा दुकानात जाऊन कॉइन बॉक्‍सवरून आपल्या नातेवाइकास सहज संपर्क करीत होते. कालांतराने मोबाईल हॅंडसेटचे दर व कॉलरेट सामान्यांच्या आवाक्‍यात आल्याने शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आले. त्यामुळे गरजेसाठी वापरण्यापेक्षा होसेसाठी मोबाईल वापरण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT