file photo
file photo 
विदर्भ

मोबाईल टॉवर! नको रे बाबा

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : नीलडोह ग्रामपंचायत अंतर्गत अमरनगर या निवासी परिसरात नव्याने सुरू झालेल्या मोबाईल टॉवरला हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी नीलडोहच्या सरपंच वनिता गडमडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
अमरनगर वॉर्ड क्र.1 मधील डाखळे लेआउटमध्ये नवीन मोबाईल टॉवर लावण्यात आला आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता हे टॉवर हटविण्यात यावे, यासाठी गुरुवारी नीलडोहच्या सरपंच वनिता गडमडे, उपसरपंच मनोज सुभेकर यांची भेट घेतली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सत्यभामा पटले, सुभाष खडेकर उपस्थित होते. नागरिकांनी या टॉवरची चौकशी करून तात्काळ हटविण्याची मागणी केली. तसेच या भरगच्च वस्तीत टॉवरला परवानगी कशी देण्यात आली? हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी सरपंच गडमडे यांनी या टॉवरला लावण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगितले. तसेच टॉवर बसविणाऱ्या कंपनीला हे टॉवर हटविण्यात यावे, अशी नोटीस बजावली आहे. तसेच हे टॉवर हटविण्यासंबंधी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले. आता या हे टॉवर कधी हटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT