Home Collapse in Mokhada sakal
विदर्भ

Unseasonal Rain : मोखाड्यावर अवकाळीची वक्रदृष्टी! झोपडी कोसळून वृध्दाचा मृत्यू, आणि वित्तहानी, शंभराहून अधिक घरांची पडझड

मोखाडा तालुक्यात सलग 5 दिवसांपासून अवकाळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

भगवान खैरनार

मोखाडा - मोखाडा तालुक्यात सलग 5 दिवसांपासून अवकाळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बुधवारी 15 मे ला झालेल्या वादळी पावसाने सातूर्ली येथील नामदेव जाधव (62) यांचा शेतावरील झोपडी कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तालुक्यात  100  हुन अधिक घरांची पडझड होऊन मोठी वित्तहानी झाली आहे.

तर आंबा आणि काजु बागांचे मोठे नुकसान झाले आहे. घरावरील छप्पर ऊडविल्याने, अनेकांचे संसार ऊघड्यावर आले आहेत. गेली पांच दिवसांपासून अवकाळीने मोखाड्याला लक्ष केले आहे. अवकाळीच्या वक्रदृष्टी ने मोखाड्याची दाणादाण ऊडवली आहे.

बुधवारी 15 मे ला सातुर्ली येथील नामदेव जाधव संध्याकाळी शेताकडे गेले होते. त्यावेळी अचानक जोरदार वादळी पाऊस सुरू झाला. जाधव आपल्या शेतातील घरात थांबले असता संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले. यात ते ढिगाऱ्याखाली दडपले व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच, मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले यांनी सातूर्ली येथील दुर्घटना स्थळाला भेट देवून जाधव कुटूंबियांचे सांत्वन केले आहे. तसेच नामदेव जाधव यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून योग्य ती मदत मिळण्यासाठी वस्तूनिष्ठ अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवल्याची माहिती तहसीलदार मयुर खेंगले यांनी दिली आहे. 

बुधवारी झालेल्या वादळी पावसाने, वाशाळा येथील जयराम गाटे, देवराम कडू, विठ्ठल डगळे, देवीदास डगळे, शंकर डगळे, हिराजी डगळे, हिरु कोरडे, पुंडलिक फाळके,चप्पलपाडा येथील वामण गांगड यांच्या आंब्याच्या बागेचे अतोनात नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांचे तर ट्रक भर फळं जमीनदोस्त झालेले आहेत.

चप्पलपाडा येथील सदाशिव वाघ यांच्या दुमजली घराचे छप्पर उडाल्याने साठवून ठेवलेले 2 कणगे भात भिजून गेले आहे. मडक्याचीमेट येथील 5 घरे व एका शाळेचे पत्रे  300 मिटर दुर उडवून नेले आहेत.सुदैवाने या परिसरात कोणी गुराखी अथवा शेतकरी नसल्याने, जीवीत हानी टळली आहे. तसेच वाशाळा येथील माध्यमिक शाळेची तर अक्षरशः धुळधाण उडवली असून एकाही इमारतीवर छप्पर म्हणून राहिलेले नाही.

दरम्यान, वाशाळा पैकी वडपाडा येथेही 3 घरांचे मोठे नुकसान झाले आहे तर सातुर्ली येथील नामदेव जाधव यांच्या जीवीत हानी बरोबरच आणखी 5 घरांची अंशतः पडझड झालेली आहे.या अवकाळीने जित्राबांचाही बळी घेतला असून पोशेरा पैकी ठाकूरवाडी येथील रामदास वारघडे यांचा 1 बैल व धोंडमाऱ्याचीमेट येथील एका शेतकऱ्याच्या 2 शेळ्या व एका बोकडाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात वादळी पावसाने  100 हुन अधिक घरांचे नुकसान आणि पडझड झाली आहे. 

घटनेची माहिती मिळताच, पालघर जिल्हापरिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष चोथे, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील,जिल्हा परिषद सदस्या सारीका निकम, माजी जि.प.गटनेते दिलीप गाटे, बेबीताई बरफ, यांच्यासह वाशाळा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य समितीने दुर्घटना स्थळांना भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी संतोष चोथे यांनी प्रत्येक आपत्तीग्रस्तांना रोख स्वरूपात वैयक्तिक आर्थिक मदत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT