file photo file photo
विदर्भ

‘मुझे आप पसंत हो’ म्हणणाऱ्या युवकाला नागरिकांनी चोपले

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : रवीनगर येथील एका व्यापारसंकुलातील दुसऱ्या माळ्यावर शालेय विद्यार्थिनीस भेटण्यासाठी बोलावून हात पकडून ‘मुझे आप पसंत हो’ अशी इच्छा व्यक्त केली. हा प्रकार माहिती पडताच संतप्त नागरिकांनी संशयित व्यक्तीस चोपून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहंमद सईद मोहंमद इस्राईल (वय ३३, रा. चपराशीपुरा) असे संशयिताचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केल्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, शालेय विद्यार्थिनी ही शिकवणी वर्गाला जाते. संशयित मोहंमद सईद हा काही दिवसांपासून तिचा पाठलाग करीत होता. शनिवारी ती घराकडे जात असताना संशयिताने तिला भेटण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर बोलविले. मुलगी त्याठिकाणी गेली असता संशयिताने तिचा हात पकडून ‘मुझे आप पसंत हो’, असे म्हणून फोन नंबर मागितला.

हा प्रकार परिसरातील काही लोकांनी बघितला. त्यांनी संशयित आरोपीला पकडून समाचार घेतला. घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. विद्यार्थिनीने नोंदविलेल्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी मो. सईद विरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पीडितेच्या तक्रारीवरून अटक केलेल्या मो. सईद याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात बदल, प्रमुख खेळाडूची अचानक माघार; BCCI च्या ट्विटने उडवली झोप

Pimpri Chinchwad Education: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘बालभारती’ची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या दारी; पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत वितरणाला सुरुवात

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रानकुत्र्यांचा सुळसुळाट; एकाच पायवाटेवर वाघ, रानडुक्कर आणि रानकुत्र्यांचे ठसे, काय आहे जंगलाचा नियम?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पाहून मला ब्रायन लारा अन् गॅरी सोबर्स आठवतात; वर्ल्ड कपविजेत्या दिग्गजाची पोचपावती

Latest Marathi News Update : रहाटणीतील तमारा सोसायटीत बिल्डरविरोधात रहिवाशांचा एल्गार; २१ दिवसांपासून आंदोलन सुरू

SCROLL FOR NEXT