Molested girl punished the young 
विदर्भ

सडकछाप मजनूला तिने घडवली जन्माची अद्दल, वाचा काय झाला प्रकार...

संतोष ताकपिरे

अमरावती : कोरोनाच्या धास्तीने सारेच हतबल आहेत. हाताल काम नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने करायचे काय, असाच प्रश्‍न बच्चे कंपनी तसेच तरुणांपुढे आहे. शिक्षण तसेच रोजगार बंद असल्याने तरुणांचे जत्थे चौकडीवर तासन्‌तास बसून असतात. तरुणांच्या रिकामटेकड्या उद्योगामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. अशीच एक घटना बडनेऱ्यात उघडकीस आली.

हाताला काम नसल्याने चौकाच्या कडेला बसून रस्त्याने ये-जा करणाऱ्या मुलींची छेड काढणे हा विष्णू हिवराळे (वय 20) व तौसिफ शहा वहाब शहा (वय 20, दोघेही रा. बडनेरा) या दोघांचा नित्यक्रम होता. दररोज ते दुपारी तासन्‌तास रस्त्याच्या कडेला बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर टॉन्ट पास करणे, त्याच्याकडे पाहून विचित्र हावभाव करणे, त्यांना भलत्याच नावाने आवाज देणे, चिडवणे असे प्रकार करायचे. त्यांच्या या मूर्ख कृतीकडे काही मुली दुर्लक्ष करायच्या, तर काहींच्या तळपायाची आग मस्तकात जायची.

काही दिवसांपासून दररोज रस्त्याने येणाऱ्या युवतींची छेडखानी करणे हा या दोघांचा नित्यक्रम झाला होता. त्यांना कुणी काही म्हणत नसल्याने दिवसेंदिवस त्यांची हिंमत वाढत होती. त्यातच एक दिवस रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणीला वाईट नजरेने बघितले. तरुणीनेही न घाबरता विष्णू आणि तौसिफ या दोघांना जाब विचारला होता. याचा राग दोघांच्या मनात होता.

तीच तरुणी गुरुवारी (ता. 16) तिच्या नातेवाइकाच्या घरासमोरून जात असताना विष्णूने तिला रस्त्यात अडवून तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावर न थांबता त्याने रस्त्यावरच युवतीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विष्णूच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी त्याच्या गालाला जोरदार चावा घेतला आणि जन्माची अद्दल घडवली. त्यावेळी विष्णूचा साथीदार तौसिफ याने सुद्धा पीडितेला धक्काबुक्की केली.

तरुणी एवढ्यावर थांबली नाही तर असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी तिने थेट बडनेरा ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध बडनेरा ठाण्यात छेडखानी, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तरुणांच्या छेडखानीला तरुणींनी भीती न बाळगता उत्तर दिले तर टवाळक्‍या करणाऱ्या रोडरोमियोंची हिंमत वाढणार नाही, अशी प्रतिक्रिया या घटनेमुळे परिसरात सुरू आहे.

पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

अमरावती शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस छेडखानी, तसेच महिलांवर बळजबरीचे प्रकार वाढत आहेत. वाढत्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केवळ रात्रीच नव्हे तर दुपारी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी महिला, तरुणींमधून होत आहे.

चौकशी सुरू

पीडितेसोबत विष्णूने गैरवर्तन केले. तौसिफने त्याला सहकार्य केले. पोलिस त्यांच्या मागावर असून, नातेवाइकांची चौकशी सुरू आहे.
पंजाब वंजारी, पोलिस निरीक्षक, बडनेरा ठाणे.

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT