file Photo 
विदर्भ

चिमुकल्या बाळासह आईची विहिरीत उडी

सकाळ वृत्तसेवा

आर्वी (जि. वर्धा) : अनैतिक संबंधाच्या कारणावरून सतत होणाऱ्या भांडणामुळे पतीसोबत दुरावलेले संबंध आणि अशात रात्री मुलगा रडायला लागल्यामुळे हैराण झालेल्या महिलेने आत्महत्या करण्याकरिता घरालगतच्या विहिरीत मुलासह उडी घेतली. दैव बलवत्तर होते म्हणून ती यातून वाचली, मात्र 16 महिन्यांच्या दुर्दैवी बालकाचा यात मृत्यू झाला. पोलिसांनी आईविरुद्ध मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. "डॉटर्स डे'च्या पूर्वसंध्येलाच सावळापूर येथे रविवारी (ता. 23) रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान, ही घटना घडली. 
प्रिया शैलेश निंबाळकर असे आरोपी आईचे तर संघर्ष असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. बाजारात जाऊन पाकीट व इलेक्‍ट्रॉनिक सामान विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या सावळापूर येथील शैलेश निंबाळकर याचे सन 2016 मध्ये सुकळी (भादोड) येथील प्रियासोबत लग्न झाले. त्यांना संघर्ष नावाचा मुलगासुद्धा झाला. शैलेशसोबत आई-वडील तसेच घटस्फोट झालेली बहीणसुद्धा राहते. बहीण-भावाच्या पवित्र नात्यावर संशय घेऊन प्रिया पती शैलेशसोबत नेहमी भांडण, शिवीगाळ करीत होती. यापूर्वीसुद्धा तिने दोनदा विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दोन महिन्यांपूर्वी मुलासोबत ती माहेरीसुद्धा गेली होती. मात्र, खरांगणा पोलिस ठाण्यात समझोता करून तिला घरी आणले. रविवारी (ता. 22) रात्री 11.30 वाजताच्या सुमारास मुलगा संघर्ष रडू लागला. पती शैलेशच्या सांगण्यावरून प्रियाने त्याला शांत करण्याकरिता घराबाहेर नेले. मात्र, तो रडायचा थांबत नव्हता. यामुळे त्रस्त प्रियाने घरालगतच्या विहिरीत मुलासह उडी घेतली. विहिरीत पडल्याचा आवाज आल्याने घरातील मंडळींसोबत शेजारील लोक धावून आले. दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. प्रिया तर वाचली मात्र सोळा महिन्यांच्या संघर्षचा मृत्यू झाला होता. शैलेश निंबाळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रिया निंबाळकरविरुद्ध गुन्हा नोंद करून तिला अटक केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

Sahyadri Tiger Reserve : वाघांच्या वाढीसाठी राधानगरी ठरतंय 'सेफ झोन'; सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर 'राणोजी'वर शिक्कामोर्तब! पर्यटनाला मिळणार गती

Latest Marathi News Live Update : भोंदू खरात प्रकरणात आणखी एका महिला अधिकाऱ्याचा संबंध

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार, कधी पूर्ण होणार?

Horoscope : उद्या बनतोय प्राप्तीयोग! 'या' 5 राशीच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा; एका रात्रीत घडेल मोठी घटना, नोकरी-धंद्यात टर्न

SCROLL FOR NEXT