विदर्भ

अक्षय तृतीया : पूजेचा मुहूर्त सकाळी ५.४० पासून १२.१७ पर्यंत; अत्यंत शुभ दिवस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अक्षय तृतीया (Akshay Tritiya) हा अत्यंत शुभ दिवस असतो. विद्वान पंडित आणि धर्माचे ज्ञान असणाऱ्यांच्या मते या दिवशी शुभकार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची आवश्यकता नसते. परंतु, तरीही यावर्षी अक्षय तृतीयाचा शुभ दिवस १४ मे रोजी असून सकाळी ५.४० ते दुपारी १२.१७ वाजेपर्यंत पूजेचा मुहूर्त असल्याची माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य (Dr. Anil Nagesh Vaidya) यांनी दिली. (Moment of Akshayya Tritiya Puja from 5.40 am to 12.17 pm)

हिंदू सणांपैकी अक्षय तृतीया हा एक महत्त्वाचा सण आहे. अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. शुक्लपक्ष म्हणजे अमावस्यानंतरचे १५ दिवस, ज्यामध्ये चंद्राचा आकार हळूहळू वाढत जातो. अक्षय तृतीया शुक्ल पक्षातच येते व याला आखाती देखील म्हटले जाते. ‘अक्षय’चा अर्थ होतो जो कधीही नष्ट होणार नाही. म्हणून असे म्हटले जाते की अक्षय तृतीया या तिथीत सौभाग्य आणि शुभ फळाची प्राप्ती होते.

या दिवशी केले जाणारे कार्य मनुष्याच्या जीवनात कधी न समाप्त होणारे फळ देतात. यादिवशी मनुष्य जेवढे पुण्य कार्य व दान धर्म करतो कार्य व दान धर्म करतो त्याचे शुभ फळ त्याला निश्चितच मिळते. अक्षय तृतीयेला विवाहासाठी शुभ दिवस मानले जाते. या दिवशी विवाह केल्याने विवाहित जोडप्यांचे बंधन मजबूत राहते.

अक्षय तृतीया साजरी करण्यामागे अनेक मान्यता आहेत. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व आहे. देवी लक्ष्मी आणि विष्णू भगवानाची पूजा करून त्यांना तांदूळ चढवले जातात. पूजेनंतर तुळशीच्या पानांसोबत त्यांना भोजन दिले जाते. सर्व पूजा झाल्यावर धूपबत्ती लावून आरती केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लहान लहान गोष्टी दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. दान केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होत. शुद्ध मनाने केलेले दान अधिक फलदायी असते, अशी माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी दिली.

(Moment of Akshayya Tritiya Puja from 5.40 am to 12.17 pm)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोनात आई गेली...आता होर्डिंग दुर्घटनेमध्ये २१ वर्षीय कमावता भरत गेला, राठोड कुटुंबावर काळाचा घाला

Marathi News Live Update: ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT