On Monday Sanjay Dhotre and On Tuesday Prakash Ambedkar will submit the application for loksabha election 2019
On Monday Sanjay Dhotre and On Tuesday Prakash Ambedkar will submit the application for loksabha election 2019 
विदर्भ

Loksabha 2019 : धोत्रे सोमवारी तर आंबेडकर मंगळवारी भरणार अर्ज

विवेक मेतकर

लोकसभा 2019
अकोला : लोकसभा निवडणुकांचा बिगूल फुंकला गेला आहे. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांची सलग चौथ्यांदा निवड झाली. सोमवारी (ता. 25) ते उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून ॲड. प्रकाश आंबेडकर सोमवारी सोलापूरातून उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अकोल्यातून ते अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (मंगळवार, ता. 26) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसकडून अद्यापही उमेदवाराचा चित्र स्पष्ट झालेले नाही. 

सोलापूर ‘फर्स्ट’ -
वंचित बहुजन आघाडीचा अकोला लोकसभेचा उमेदवार कोण, याबाबत अजूनही संभ्रम आहे. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रथम प्राधान्य सोलापूरला असून, सोमवारी सोलापूर येथे अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या विरोधात अकोल्यातून मंगळवारी त्यांची अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अकोला लोकसभा वंचित आघाडीच्या वतीने प्रा. अंजली आंबेडकर निवडणूक लढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहेच. मात्र, ॲड. आंबेडकरांनी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढणार नसल्याचे सुतोवाच आधिच केले आहे. 

अंतर्गत धूसफुसीचे आव्हान - 
सद्या आघाडी व युती अशा लढतीचे चित्र असताना, युती व आघाडीतील पक्षांची अंतर्गत धूसफूस ही जय-पराजयाच्या गणिताची फेरमांडणी करणारी ठरणार असल्याची शक्यता आहे. भाजपामध्ये असलेले दोनही गट अंतर्गत वादामुळे विजयाची वाट बिकट करू शकतात. काँग्रेसच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही अकोला लोकसभेसाठी महत्वाची ठरणार आहे. जिल्‍ह्यातील गावखेड्यांमध्ये मोठे ‘नेटवर्क’ असलेल्या सहकार क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरू शकते. 

काँग्रेसचा हात मागेच -
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आघाडीचे उमेदवार म्हणून शहरात गत तीन दिवसांपासून डॉ. अभय पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान खासदार धोत्रे यांची उमेदवारी निश्चित झालेली असून, मराठा उमेदवाराऐवजी मुस्लिम किंवा ओबीसी प्रवर्गातील उमेदवार देण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसकडे उमेदवारांचीच वानवा असल्याने अकोटचे हिदायत पटेल यांचेही नाव चर्चेत आहे. नव्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. अभय पाटील यांनी जनमानसात भक्कम स्थान मिळवले असले तरी, पक्षाकडून जुन्याच नावाला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे. 

स्टार प्रचारक मैदानात -
गुढीपाडव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोल्यात जाहीर सभा होत आहे. भाजपा उमेदवार ॲड. धोत्रे यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. सभेला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ, विदेशमंत्री सुषमा स्वराज, स्मृती इराणी, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण आणि पियुष गोयल यांच्यापैकी काहींची अकोल्यातील सभेला उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT