money on 7 12 of income tax paying farmers who take kisan samman fund in yavatmal 
विदर्भ

किसान सन्मान योजनेचा निधी घेणे पडले महाग, आता सातबारावर चढणार बोजा

चेतन देशमुख

यवतमाळ : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या व आयकर भरणाऱ्या जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यातील काही शेतकऱ्यांनी रक्कम भरली आहे. मात्र, ज्यांनी रकमेचा परतावा केला नाही, अशा शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढविला जाण्याची शक्‍यता आहे. 

केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली. राज्यात फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्‍टरपर्यंत लागवडीयोग्य क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबास प्रतिहप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये असा लाभ देण्यात येतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी माहिती अपलोड केली होती. मात्र, लाभ घेण्याच्या दृष्टीने आयकर, सरकारी अधिकारी, कर्मचारी, पेन्शनधारक, दोन हेक्‍टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर माहिती भरली. या माहितीच्या आधारावर संबंधित शेतकऱ्यांना योजनेचा लाभसुद्घा देण्यात आला. अशा शेतकऱ्यांकडून शासनाने आता वसुली सुरू केली आहे. 

लाभ देण्यात आलेल्यांपैकी ४ हजार ६४६ शेतकरी आयकर भरणारे निघाले आहेत. त्यांच्या खात्यात तब्बल ४ कोटी १८ लाख रुपयांचा निधी टाकण्यात आल्याची बाब समोर आली. अशा शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस बजावत आली आहे. लाभ घेतलेली रक्कम त्वरित भरावी, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यातील मोजक्‍याच शेतकऱ्यांनी ४७ लाखांहून अधिक रक्कम शासनाकडे जमा केली आहे. अजूनही उर्वरित शेतकरी उचल केलेला हप्ता परत देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता प्रशासन कारवाईच्या तयारीत आहे. ज्या शेतकऱ्यांनी रक्कम भरली नाही, अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढविण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Chhatrapati Sambhajinagar: जुन्या शहरात पुन्हा धावणार स्मार्ट बस – पर्यटक व नागरिकांसाठी सुविधा वाढवणार

Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT