Monsoon in Vidarbha rain forecast next four days in other part of maharashtra weather sakal
विदर्भ

Monsoon Update : विदर्भात दाखल झाले मॉन्सून; पुढील चार दिवसात राज्याच्या आणखी भागांमध्ये करणार प्रवेश

मॉन्सूनची प्रगती होताच आता विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अखेर राज्याच्या आणखी काही भागात आगमन करत प्रवास सुरू ठेवला आहे. तळ कोकणासह, दक्षिण मध्य महाराष्ट्रात ११ जून ला प्रवेश केल्यानंतर आता मॉन्सून एक्स्प्रेसने थेट पूर्व विदर्भात काही ठिकाणी मजल मारली आहे. दरम्यान पुढील तीन ते चार दिवसात राज्यासह तेलंगण व कर्नाटकाच्या आणखी काही भागांमध्ये मॉन्सून प्रगती करणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मॉन्सूनने शुक्रवारी (ता. २३) आंध्र प्रदेश, ओडिशा तसेच पश्‍चिम बंगाल, बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग व्यापला आहे. त्याचबरोबर झारखंड, बिहार, कर्नाटक, तेलंगणाच्या काही भागांसह महाराष्ट्रात पूर्व विदर्भ, पूर्व उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड येथील काही भागात प्रगती केली आहे.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या मॉन्सूनची सीमा रत्नागिरी, विजापूर, निजामाबाद ते सिद्धार्थनगरपर्यंत असून अरबी समुद्रावरून मात्र मॉन्सूनची प्रगती अद्याप अडखळत सुरू आहे. यातच आता पुढील प्रगतीसाठी पोषक स्‍थिती पाहता मॉन्सून पुढील चार दिवसांमध्ये म्हणजेच मंगळवारपर्यंत (ता. २७) राज्याच्या अजून काही भागांमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत.

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा ः

मॉन्सूनची प्रगती होताच आता विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या हजेरीमुळे आता विदर्भातील उष्ण लाटेची स्थिती निवळली असून कमाल तापमानाचा पारा ही घसरला आहे. दरम्यान शनिवारी (ता. २४) चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात शुक्रवारी (ता. २३) उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे ३९.२ अंश सेल्सिअस इतकी झाली, तसेच विदर्भातील बऱ्याच भागात पारा २९ अंश व त्यापेक्षा कमी नोंदला गेला. सध्या उत्तर प्रदेश परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय असून या प्रणालीपासून पंजाबपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर केरळच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तर राज्यात पुढील चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत.

शनिवारी (ता. २४) येथे पावसाचा इशारा ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलडाणा, जळगाव, नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

SCROLL FOR NEXT