file photo
file photo 
विदर्भ

पावसाने सुखावला वैदर्भीय बळीराजा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर मॉन्सूनने अखेर विदर्भात प्रवेश केल्याची घोषणा हवामान खात्याने केली. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत पावसाने रविवारी (ता. 23) हजेरी लावली. तर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या आगमनाने विदर्भातील शेतकरी सुखावला असून पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात मृगनक्षत्राच्या शेवटी जिल्ह्यातील काही भागात रविवारी तुरळक पाऊस तर पुलगाव परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. अंदाजे एक तास आलेल्या पावसाने रस्त्यावर डबके साचले होते. पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी आनंदी आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी हिंगणघाट तालुक्‍यातील गोजी, जामणी परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली होती. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरू केली आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास पुलगाव परिसरातील नाचणगाव, आपटी, वाघोली, दहेगाव (धांदे), कवठा आदी गावांत दमदार पाऊस झाला.
गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागांत रविवारी (ता. 23) वादळवाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली असून नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी सकाळी तर काही भागात दुपारी पाऊस पडला. आरमोरी तालुक्‍यातील वैरागड येथे वादळवाऱ्याने अनेक घरांची पडझड झाली. रस्त्यावर वृक्ष कोलमडून पडल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात रविवारी रिमझिम पाऊस झाला. अद्याप पावसाला अपेक्षेप्रमाणे सुरुवात झाली नसल्याने येथील बळीराजा चिंतित आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, दिग्रस व पांढरकवडा येथे शनिवारी (ता. 22) सरासरी 98 टक्के पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली. मात्र, यवतमाळकरांचा रविवार कोरडाच गेला.
सलग पावसाने अमरावतीकर सुखावले
जिवाची लाहीलाही करून सोडणाऱ्या उकाड्यापासून अमरावतीकरांची काही अंशी सुटका झाली आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी बरसलेल्या मृगधारांनी जनजीवन सुखावले, विशेष म्हणजे या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांसह सारेच मृगाच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, पावसाने सातत्याने हुलकावणी दिल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली. मृगनक्षत्र सुरू झाले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पेरणीचा मुहूर्तसुद्धा टळला. मात्र, शनिवारी सायंकाळी पावसाने धुवाधार बॅंटिग करीत आपल्या आगमानाची चुणूक दाखवून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT