monsoon sakal
विदर्भ

Monsoon : विदर्भात २५ जूनपासून जोरदार पावसाचा अंदाज; हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे भाकित

सकाळ डिजिटल टीम

वाडेगाव (जि.अकोला : पावसाळ्याला प्रारंभ होवून जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी उलटून सुध्दा आतापर्यंत समाधान कारक पाऊस पडला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बाब म्हणजे, हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी ता. २५ जूनपासून विदर्भात सर्वदूर पाऊस समाधानकारक पडणार असल्याचे भाकित व्यक्त केले आहे.

वाडेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापूर तसेच पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी डॉ. वा. रा. कोरपे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथिल कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

हवामानाबाबत अचूक अंदाज व्यक्त करण्याची खात्या असलेल्या पंजाब डख यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांना त्यांनी दिलासा देणारी माहिती या कार्यक्रातून दिली. हवामान विषयक सखोल व सविस्तरपणे अभ्यास करून त्यांनी मांडलेले अंदाज आतापर्यंत खरे ठरत आले आहे.

यावर्षीही त्यांनी पावसाचे प्रमाण कुठल्या महिन्यात अधिक व कुठल्या महिन्यात कमी राहतील याबाबत आधीच अंदाज वर्तविले होते. भविष्यात पडणारा अवकाळी पाऊस, त्यातून होणारे शेती पिकांचे नुकसान यासह अधिकाधिक उतारा देणारे सोयाबीनचे वाण या विषयावर त्यांनी या कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली.

विदर्भातील पेरण्या पावसा अभावी रखडल्या असल्या तरी ता. २५ जूनपासून विदर्भात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला असून, पेरणी करण्यायोग्य पाऊस होणार असल्याने शेती कामांना वेग येईल, असे पंजाब डख म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Society Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : लडाख प्रशासनाने सोनम वांगचुक यांच्या एचआयएएलला बजावली नोटीस

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

SCROLL FOR NEXT