monsoon disease esakal
विदर्भ

Monsoon Viral Diseases : पावसाचा वाढता प्रभाव; विषाणूजन्य आजारांचा फैलाव

रुग्णालय फुल्ल ः लहानांसह मोठ्यांनाही आजाराने ग्रासले

सकाळ डिजिटल टीम

लोणार : वातावरण बदल होत असतानाच लोणार शहरात विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे दिसत आहे. जुलै महिन्यात सततच्या पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे रुग्ण वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्यूमोनिया, अतिसार, डेंगू असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

शहरात अनेक बालकांना सर्दी, खोकल्याने ग्रासले असून रुग्णालयात लहान मुलांसह मोठ्या रुग्णांची गर्दी वाढत आहे. श्वासाची गती वाढणे, ताप येणे , चिडचिड अशी लक्षणे आढळून येत आहे. न्युमोनिया, डेंगूचेही काही रुग्ण आढळले. गंभीर आजार असल्यामुळे अशा बाल रुग्णांना मेहकर, बुलडाणा, अकोला, औरंगाबाद अशा ठिकाणी उपचारासाठी पाठविले जात आहे.

स्वच्छता राखा

आजारी व्यक्तींशी संपर्क टाळणे आवश्यक आहे.आजारी व्यक्तींनी नाकाला रुमाल बांधला पाहिजे. वेळोवेळी हात धुतल्यास आजाराचा फैलाव होण्यास अटकाव होईल.असा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्याचप्रमाणे धूळ, धूर, डास पळविणाऱ्या अगरबत्ती, उदबत् , पाळीव प्राणी , परफ्यु, स्प्रे टाळले पाहिजे

तसेच उबदार आणि जंतूसंसर्ग विरहीत कपडे वापरून वैद्यकीय सल्यानुसार औषधोपचार करत राहणेही गरजेचे आहे.दोन दिवसापासून रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे.आहार–विहाराची काळजी घेतल्यास आजारावर नियंत्रण राहील. वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेऊनच औषधोपचार घ्यावेत.

- डॉ. भास्करराव मापारी, जनरल फिजिशियन, लोणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT