अमरावती ः जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यापुर्वी इर्विन चौकात एकत्र आलेल्या महिला.  
विदर्भ

नाउमेद झालेल्या `उमेद' च्या महिलांनी काढला मोर्चा

सुधीर भारती

अमरावती : महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्यात सुरू असलेल्या ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत (उमेद) कार्यरत महिलांचे करार संपले असून पुनर्नियुक्ती थांबविण्यात आली आहे. पुनर्नियुक्तीच्या मागणीसाठी उमेदच्या कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सोमवारी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

कृती समितीचे संयोजक किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. राज्यात २०११ पासून जीवन्नोती अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत महिलांचे बचतगट निर्माण करून त्यांची क्षमता बांधणी करणे, जिल्हा, तालुका, प्रभाग तसेच ग्रामस्तरावर अभियान कक्षाची स्थापना करणे, त्यांच्या या कामामुळेच राज्यात जवळपास पाच लाख बचतगट तर २० हजार २७७ ग्रामसंघ तयार झाले आहेत. वरील सर्व कामे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असताना जीवन्नोती अभियानाकडून करार संपलेल्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती थांबविण्यात आली आहे. त्यामुळे महिला तसेच त्यांच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होत असल्याचा आरोप महिलांनी केला.

ज्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती थांबली आहे त्यांना तत्काळ ती देण्यात यावी, कोणत्याही बाह्य संस्थेला कर्मचारी नियुक्तीचे अधिकार देण्यात येऊ नये, ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना हटविण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तत्पूर्वी इर्विन चौकातून महिला कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. मोर्चात विजय पाटील, अजय कुलथे, कुसुम साहू, राधा कुरील, संध्या टिकले, लता देशमुख, सुचिता बिरे, छाया अंबाडकर, प्रणीत सोनी, सचिन नाईक, दीपक खताडे, मंगेश खोंडे, गजानन देशमुख यांच्यासह अन्य उपस्थित होते.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT