संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

कोरोना नियंत्रणासाठी १६ लाखांहून अधिक नागरिकांशी संपर्क

सुधीर भारती

अमरावती : ट्रेस, ट्रिक, ऍण्ड ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब करत अमलात आलेली माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम कोरोना नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. मोहिमेचा दुसरा टप्पा १२ ऑक्‍टोबर ते २४ ऑक्‍टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देतानाच आवश्‍यक सामग्रीचे दरही निश्‍चित करण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहीमेत १६ लाखांहून अधिक व्यक्तींशी संपर्क झाला आहे. कोरोना उपचारांसाठी बेडची संख्या व विविध सुविधा वाढविताना ऑक्‍सिजन व इतर साधनसामग्रीचे दरही निश्‍चित करण्यात आले आहेत. कुठेही जादा दर घेऊन नागरिकांची अडवणूक होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्‍यक आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. असे आवाहनही त्यांनी केले. ऑक्‍सिजनची मागणी व पुरवठा, तसेच दरात सुसूत्रता आणण्यासाठी रसायन व उर्वरक मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाकडून दर निश्‍चित करून देण्यात आले आहेत. त्यानुसार लिक्विड मेडिकल ऑक्‍सिजनसाठी प्रति क्‍युबिक मीटरप्रमाणे १५.२२ रू. (जीएसटी वगळून) व ऑक्‍सिजन इन्हेलेशन (मेडिकल गॅस) इन सिलिंडरसाठी प्रति क्‍युबिक मीटरप्रमाणे२५.७१ रू. (जीएसटी वगळून) असे दर निश्‍चित करण्यात आले आहेत.
संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT