more application for RTE admission on last day in nandori of wardha 
विदर्भ

आरटीईसाठी अखेरच्या दिवशी अर्जांचा पाऊस, तब्बल २ लाखांपेक्षा अधिक अर्ज

सकाळ वृत्तसेवा

नंदोरी (जि. वर्धा) : शासनाने शाळांमध्ये आरटीईअंतर्गत गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्‍के जागा आरक्षित केल्या आहेत. यंदा राज्यातील अशा ९६ हजार ६८४ जागांसाठी तब्बल २ लाख १५ हजार ८७२ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख मंगळवार (३० मार्च) होती. 

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्‍के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. शिक्षण विभागाने अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मार्च दिली आहे. मात्र, शाळांना आरटीई शुल्क परतावा न मिळाल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संस्थाचालक संघटनेने घेतला आहे. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे बहुतांश आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय पालकांनी आरटीई प्रवेशातून आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, या उद्देशाने मोठ्या संख्येने ऑनलाइनपद्धतीने अर्ज सादर केले आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उपलब्ध जागांपेक्षा दुपटीहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. 

राज्यातील ९६ हजार ६८४ जागांसाठी २ लाख १५ हजार ८७२ अर्ज दाखल झाले आहे. त्यात विदर्भातील अकरा जिल्ह्यातील २२९१ शाळांमध्ये १८ हजार ८९४ जागा होत्या व त्यासाठी ५३ हजार ६५८ अर्ज आले आहेत. 

विदर्भातील आकडेवारी - 

जिल्हा शाळा रिक्त जागा प्राप्त अर्ज 
 
भंडारा ९४ ७९१ २०१७ 
चंद्रपूर १९६ १५७१ ३००२
गडचिरोली ७६ ६२४ ६७८ 
गोंदिया १४७ ८७९ २३२०
नागपूर ६८० ५७२९ २३८०९ 
वर्धा ११६ ११२९ ३२५३ 
अमरावती २४४ २०७६ ५९१८ 
अकोला २०२ १९६० ४६६८ 
यवतमाळ २०२ १२७५ ३३८५ 
बुलडाणा २३१ २१४२ ३४३३ 
वाशीम १०३ ७१८ १११५ 
एकूण २२९१ १८८९४ ५३६५८ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT