Crime
Crime 
विदर्भ

शहरापेक्षा ग्रामीण भागात गुन्हेगार जास्त

सकाळवृत्तसेवा

नागपूर - नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास शहरात सर्वाधिक गुन्हे होतात. शंभरावर गुन्हेगारांच्या टोळ्याही सक्रिय असल्याचे सांगण्यात येते. गुन्हेगारीवृत्तीचे लोक मात्र शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त आहेत.

पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या अहवालातून हे स्पष्ट होते. शहरात गुन्हे करणारे हे ग्रामीण भागातील आहे, असेच चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे शहरातील गुन्हेगारांचा वाचविण्याचा तर प्रयत्न होत नाहीना, असा सवालही उपस्थित होत आहे. 

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाकरिता ११ एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाकडून आवश्‍यक कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल हे सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून आहेत. सर्व कामाचा आढाव घेत आहेत. निवडणूक शांततेत आणि पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहेत.  

विविध भरारी पथकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. निवडणुकीत मतदारांवर गुन्हेगारांकडून दबाव टाकण्याची शक्‍यता असते. अशा अनेक घटकाही समोर आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुन्हेगारीवृत्ती व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पोलिस विभागाला दिलेत.

पोलिसांनी गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींची एक यादी तयार केली आहे. या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. काहींकडून चांगल्या वर्तणुकीसंदर्भात हमीपत्र लिहून घेण्यात आल्याची माहिती आहे. 

जिल्ह्यात १ हजार ५४० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाकडून जिल्हा प्रशासन विभागाला देण्यात आली आहे. नागपूर शहरात ५०५ तर ग्रामीण भागात १०३५ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक  कारवाई करण्याचे प्रमाण जास्त आहे. 

यामुळे ग्रामीण भागात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शहराच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसते. वास्तविक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. अनेक टोळ्या शहरात सक्रिय आहेत. असे असताना शहरात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रमाण कमी असल्याचे आश्‍यर्च व्यक्त करण्यात येत आहे.

साडेतीनशे शस्त्रे जमा
परवाना असलेले शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हानिवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी  अश्‍विन मुद्‌गल यांनी दिले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत ३५० शस्त्रे जमा झाली आहेत. नागपूर शहरात २७५ तर ग्रामीण भागातील ७५ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

SCROLL FOR NEXT