more response to bharat bandh agitation in chandrapur 
विदर्भ

Bharat Bandh Updates : चंद्रपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद, अनेक संघटनांचा सहभाग

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : केंद्र शासनाने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळपासून शहरासह जिल्ह्यातील दुकाने, बाजारपेठ बंद करण्यात आली होती. या बंदला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

चंद्रपूर शहरात सकाळी काँग्रेसचा प्रमुख मार्गाने मोर्चा निघाला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारचा निषेध करीत मोर्चा प्रमुख मार्गाने निघाला. शेतकरीविरोधी कायदे तातडीने रद्द करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढली. दुचाकी रॅली प्रमुख मार्गाने निघाली. यात शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.  राष्ट्रीय ओबीसी महासंघाने  बंदला पाठींबा दिला होता. स्थानिक जनता कॉलेज चौकात अकरा वाजता निदर्शने केली. घोषणा दिल्या. यावेळी गर्दी जमल्याने काही वेळेसाठी रस्ता जाम झाला होता. कृषीप्रधान देशात शेतकरीविरोधी कायदे होऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन राष्ट्रीय कृषी कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापले आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करीत शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी मांडले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष नितिन कुकडे, सचिव विजय मालेकर, कार्याध्यक्ष बबन राजूरकर, डॉ. संजय बरडे, संजय सपाटे, आल्हाद बहादे, रविकांत वरारकर, मंगेश पाचभाई, जिल्हा महिला अध्यक्षा ज्योत्सना राजूरकर, विद्या शिंदे,  मंजुळा डुडुरे, राहुल ठाकूर, जितेंद्र बुचे, सचिन थिपे, प्रकाश गाठे यांची उपस्थिती होती. बंददरम्यान औषधी दुकाने, पेट्रोलपंप वगळता सर्वच प्रतिष्ठाने बंद होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT